शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

मनसे फॅक्टर ठरले पंक्चर

By admin | Updated: May 17, 2014 03:47 IST

नरेंद्र मोदींच्या लाटेचा फटका मुंबई, ठाणे आणि रायगडमधील सर्व विद्यमान खासदारांना बसला. मनसे फॅक्टर प्रभावशून्य ठरवित या परिसरातील बाराही जागांवर महायुतीची मोहोर मतदारांनी उमटविली.

नरेंद्र मोदींच्या लाटेचा फटका मुंबई, ठाणे आणि रायगडमधील सर्व विद्यमान खासदारांना बसला. मनसे फॅक्टर प्रभावशून्य ठरवित या परिसरातील बाराही जागांवर महायुतीची मोहोर मतदारांनी उमटविली. मुंबईच्या सहा, ठाण्याच्या चार आणि रायगडमधील मावळसह दोन जागांवर महायुतीचे उमेदवार दणक्यात निवडून आले. या शहरी पट्ट्यात मोदी लाटेवर स्वार होत अनेक धक्कादायक आणि अनपेक्षित निकाल लागल्याचे दिसते. नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देत भाजपाच्या उमेदवारासमोर आपले उमेदवार उभे न करणार्‍या मनसेच्या राज ठाकरे यांना मात्र मोदी लाटेपासून कोणताच लाभ झाला नसल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. मनसेचे शिवसेनेसमोरील सर्वच्या सर्व उमेदवार या निवडणुकीत गारद झाल्याने मनसे फॅक्टर या निवडणुकीत कुचकामी ठरला आहे. २00९ च्या निवडणुकीत मनसेच्या सहाही उमेदवारांनी लाखाच्या घरात मते मिळवली होती. त्यामुळे शिवसेना-भाजपा युतीचे सहाच्या सहा उमेदवार भुईसपाट होत काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते. मनसे फॅक्टर काँग्रेसच्या पथ्यावरच पडला होता. मागील निवडणुकीतील या मनसे लाटेचा या निवडणुकीत मात्र मागमूसही दिसला नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात शिवसेनेचा मुंबईकरांवरील पगडा कमी होऊन मनसेचा प्रभाव वाढेल, ही अटकळही चुकीची ठरली आहे. शिवसैनिकांनी चिकाटीने आपले उमेदवार निवडून आणत बाळासाहेबांना आपल्यापरीने श्रद्धांजलीच वाहिल्याचे पहावयास मिळत आहे. बाळासाहेबांनी गद्दार ठरवलेल्या सर्वच नेत्यांना या निवडणुुकीत पाठ टेकावी लागली आहे. गुजरातमध्ये जाऊन मोदी यांच्या विकासकामांची तारीफ करणार्‍या राज ठाकरे यांनी या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मोदींना पाठिंबा देतानाच राज ठाकरे यांनी शिवसेना उमेदवारांसमोर आपले उमेदवार उभे केले. त्यामुळे जिथे शिवसेना उमेदवार आहेत तेथील मोदीसमर्थक आपली मते मनसेच्या पारड्यात टाकतील, हा राजकीय विश्लेषकांचा होरा होता. प्रत्यक्षात तसे काहीच झाले नाही तर गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मनसेची मते कमीच झाली.