शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
3
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
4
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
5
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
6
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
7
सिंधुदुर्गात राणेंचं पाऊल पुढे, तर या दोन मतदरासंघांचा कल राऊतांकडे; तळकोकणात कोण जिंकणार?
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
9
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
10
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
12
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
13
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
14
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
15
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
16
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
17
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
18
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
19
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
20
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड

लबाड सरकारला खाली खेचा - शरद पवार; औरंगाबादला ‘हल्लाबोल’ मोर्चाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2018 5:42 AM

लबाडाचे आवतण जेवल्याशिवाय खरे नसते. सध्याचे सरकारही लबाड आहे. नुसतेच आश्वासने देतेय. ही आश्वासने पदरात पडल्याशिवाय काही खरे नाही. उत्पादन खर्चावर आधारित भाव देऊ व त्यात ५० टक्के नफा मिळवू, हे ताजे आश्वासन सपशेल खोटे आहे.

औरंगाबाद : लबाडाचे आवतण जेवल्याशिवाय खरे नसते. सध्याचे सरकारही लबाड आहे. नुसतेच आश्वासने देतेय. ही आश्वासने पदरात पडल्याशिवाय काही खरे नाही. उत्पादन खर्चावर आधारित भाव देऊ व त्यात ५० टक्के नफा मिळवू, हे ताजे आश्वासन सपशेल खोटे आहे. सरकार शेतक-यांची पुन्हा फसवणूक करीत आहे. त्यामुळे लबाडांना सत्तेतून बाहेर काढा, असे आवाहन शरद पवार यांनी येथे केले.केंद्र व राज्य सरकारच्या मराठवाडा विरोधी भूमिकेचा निषेध करून विकासप्रक्रिया सुरू करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीतर्फे ‘हल्लाबोल’ संघर्ष यात्रा काढण्यात आली. त्याचा समारोप शनिवारी येथे विराट सभेने झाला. आधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चा काढण्यात आला. शरद पवार यांनी केंद्र व राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली. ‘तीन तलाक’च्या मुद्द्यावरून सरकार धर्मात लुडबुड करीत आहे. कुराणाने ‘तीन तलाक’ सांगितलेले आहेत. एका धर्माच्या लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे, असा आरोप करून नोटाबंदीने कुणाचे भले झाले, असा मार्मिक सवालही त्यांनी केला.अजितदादांची पोलिसांना तंबीपत्रकारांना अडवून त्यांचे मोबाइल नंबर्स लिहून घेतले जात आहेत, अशी तक्रार अजित पवार यांच्यापर्यंत गेली आणि दादा खवळले. हे अजिबात सहन करणार नाही. पत्रकारांना त्रास देण्याची गरज नाही. त्यांना त्यांचे काम करू द्या. राज्यात एक प्रकारची आणीबाणी चालू आहे. जनतेचा आवाज दाबाल तर बटणं कोणती दाबायची हे जनता ठरवते, हे लक्षात ठेवा, असे त्यांनी सुनावले.- गाजर दाखविण्यालाही काही मर्यादा असतात. आता गाजरसुद्धा यांच्यामुळे बदनाम झाल्याची खरमरीत टीका आमदार अजित पवार यांनी केली. माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनीही मार्गदर्शन केले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी हल्लाबोल आंदोलनाचा कार्य अहवाल सादर करून उर्वरित महाराष्ट्रातही आंदोलन करण्याची घोषणा केली.महिलांना ५०टक्के आरक्षणद्या : सुप्रिया सुळेकेंद्र सरकार मुस्लीम महिलांना न्याय देण्यासाठी ‘तीन तलाक’विरोधी कायदा करीत आहे. महिलांना न्याय द्यायचाच असेल, तर सर्व क्षेत्रात ५० टक्के आरक्षण देण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAurangabadऔरंगाबाद