शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

लॉटरी घोटाळ्यावर जनहित याचिका

By admin | Updated: June 15, 2016 03:26 IST

आघाडी सरकारच्या काळातीलच नव्हे, तर भाजप-शिवसेना सरकाराच्या काळातही सुरू असलेल्या राज्यातील आॅनलाईन लॉटरीचा हजारो कोटी रुपयांचा घोटाळा ‘लोकमत’ने उघडकीस

- राजेश निस्ताने,  यवतमाळ

आघाडी सरकारच्या काळातीलच नव्हे, तर भाजप-शिवसेना सरकाराच्या काळातही सुरू असलेल्या राज्यातील आॅनलाईन लॉटरीचा हजारो कोटी रुपयांचा घोटाळा ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल झाली असून न्यायालयाने केंद्रीय गृह विभाग व राज्याच्या गृह खात्याला नोटीस बजावली आहे. न्या. भूषण गवई व न्या. देशमुख यांच्या खंडपीठाने केंद्र व राज्य शासनाला आपली बाजू मांडण्यासाठी सहा आठवड्यांचा अवधी दिला आहे. यवतमाळातील चंदन त्रिवेदी यांनी ही जनहित याचिका (क्र.७८/२०१६) दाखल केली. लॉटरीबाबत राज्य शासनाकडे सर्व्हर, कंपन्या, ड्रॉ याची कोणतीही माहिती नाही. शासनाचे अधिकारी या प्रकरणी एकमेकांवर जबाबदारी ढकल असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले. २००१ ते २००९ या काळातील आॅनलाईन लॉटरीत मोठा घोटाळा झाला. लॉटरीतून वर्षाकाठी १० हजार कोटींची उलाढाल होते. त्यातून ३ हजार कोटी प्राप्तीकर अपेक्षित असताना प्रत्यक्षात क६०० कोटी भरुन २४०० कोटींचा प्राप्तीकर दडपला गेला. दरदिवशी निघणाऱ्या ४३ ड्रॉमधून शासनाचा ९०० कोटींचा महसूल बुडविला गेला.आॅनलाईन लॉटरीत प्रत्येक आठवड्याला ड्रॉची परवानगी घेतली जाते. मात्र, एका ड्रॉची परवानगी असताना दिवसभरात ४३ ड्रॉ काढले जात आहेत. शिवाय, २३ पेक्षा अधिक ड्रॉ एका दिवशी काढू नये असा केंद्रीय गृह खात्याचा आदेश असतानाही राज्यात दरदिवशी ४३ ड्रॉ काढले जात आहेत. ‘लोकमत’ने या घोटाळ्याचा पर्दाफाश केल्यानंतर राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गृह खात्याकडे याबाबतची चौकशी सोपविली.

जयंत पाटील यांच्यावर आरोपया घोटाळ्याची सीआयडी अप्पर पोलिस महासंचालकांनी चौकशी करून सरकारला अहवाल सादर केला. मात्र तत्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील यांनी हा अहवाल दाबून घोटाळेबाजांना पाठिशी घातले, असा आरोप माजी आयएएस अधिकारी आनंद कुलकर्णी यांनी केला आहे. यासंदर्भात पाटील यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (जिल्हा प्रतिनिधी)