अकोल्यात सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणूक शांततेत;उत्साहपूर्ण वातावरणात बाप्पाला निरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2017 07:06 PM2017-09-05T19:06:05+5:302017-09-05T19:07:50+5:30

श्री. बाराभाई गणपती पूजनाने अकोल्यात गणेश विसर्जन मिरवणूकीस प्रारंभ झाला.

Public celebrations of Ganeshotsav in Akola, peace talks; | अकोल्यात सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणूक शांततेत;उत्साहपूर्ण वातावरणात बाप्पाला निरोप

अकोल्यात सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणूक शांततेत;उत्साहपूर्ण वातावरणात बाप्पाला निरोप

Next
ठळक मुद्दे श्री. बाराभाई गणपती पूजनाने अकोल्यात गणेश विसर्जन मिरवणूकीस प्रारंभ झाला. मानाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री. बाराभाई गणपतीचे पूजन मान्यवर लोकप्रतिनिधी तसेच जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या हस्ते झाले. 

अकोला, दि. 5- श्री. बाराभाई गणपती पूजनाने अकोल्यात गणेश विसर्जन मिरवणूकीस प्रारंभ झाला. मानाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री. बाराभाई गणपतीचे पूजन मान्यवर लोकप्रतिनिधी तसेच जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या हस्ते झाले. 
यावेळी गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार संजय धोत्रे, आमदार रणधिर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, महापौर विजय अग्रवाल, माजी महापौर सुमनताई गावंडे, श्री. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मोतिसिंह मोहता, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा पोलिस अधिक्षक एम. राकेश कलासागर यांनी गणपती पूजन केले.

यानंतर गणरायाला आरती ओवाळण्यात आली. श्री. बाराभाई गणपती मंडळातर्फे प्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी अतिरिक्त पोलिस अधिक्षक विजयकांत सागर, महापालिका आयुक्त अजय लहाने, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, उपविभागीय पोलिस अधिकारी उमेश माने पाटील, तहसिलदार राजेश्वर हांडे उपस्थित होते. गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसत आहे.

Web Title: Public celebrations of Ganeshotsav in Akola, peace talks;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.