शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
5
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
6
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
7
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
8
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
9
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
10
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
11
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
12
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
13
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
14
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
15
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
16
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
17
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

‘डल्लामार’चे पुरावे देणार - मुख्यमंत्री आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 5:44 AM

नागपूर -  विरोधकांच्या ‘डल्लामार’ यात्रेचे पुरावे सभागृहासमोर मांडण्यात येतील, असे सांगत शेतकºयांच्या स्थितीला काँग्रेस-राष्ट्रवादीच कसे जबाबदार आहे हे पुराव्यांसह सादर करू, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिला.विरोधकांकडून कर्जमाफी तसेच शिष्यवृत्तीसंदर्भात आरोप होत आहेत. मात्र घोटाळे करण्याची सवय असलेल्यांना प्रामाणिकपणे काम होत आहे, यावर विश्वासच बसत नाही. सिंचन घोटाळ्याची ...

नागपूर -  विरोधकांच्या ‘डल्लामार’ यात्रेचे पुरावे सभागृहासमोर मांडण्यात येतील, असे सांगत शेतकºयांच्या स्थितीला काँग्रेस-राष्ट्रवादीच कसे जबाबदार आहे हे पुराव्यांसह सादर करू, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिला.विरोधकांकडून कर्जमाफी तसेच शिष्यवृत्तीसंदर्भात आरोप होत आहेत. मात्र घोटाळे करण्याची सवय असलेल्यांना प्रामाणिकपणे काम होत आहे, यावर विश्वासच बसत नाही. सिंचन घोटाळ्याची चौकशी योग्य दिशेने होत आहे. यासंदर्भात आणखी अनेक जणांवरदेखील कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. कर्जमाफी झालेल्या शेतकºयांची तालुकानिहाय नावे जाहीर करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले. कर्जमाफीसाठी एकूण ७७ लाख खात्यांचे अर्ज आले. त्यापैकी ६९ लाख खाती प्रोसेसिंगसाठी घेतली. त्यातून जवळपास ४१ लाख खात्यांचे निर्णय झाले असून त्यांच्यासाठी निधीही मंजूर करण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.बोंडअळीबाबत केंद्राला प्रस्तावबोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कापूस उत्पादक शेतक-यांचे नुकसान झाले आहे. ‘बीटी’चे ‘लायसन्स’ देण्यात येत असताना पिकांवर अळीचा प्रादुर्भाव होणार नाही, असा दावा कंपन्यांनी केला होता. त्या कंपन्यांकडून शेतक-यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यात येईल. सोबतच ‘एनडीआरएफ’च्या माध्यमातून केंद्राकडूनदेखील मदत घेण्यात येईल. याबाबत प्रस्ताव पाठविण्यात आला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.विरोधकांची ‘टेप’ सैराटवरच अडकलीविरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी राज्य शासनावर टीका करत ‘सैराट’ कारभार सुरू असल्याची टीका केली. तीन वर्षांनंतरदेखील विरोधकांची ‘टेप’ सैराटवरच अडकली आहे. त्यानंतर निघालेल्या चित्रपटांची नावे त्यांना कुणीतरी द्यावी, असा चिमटा मुख्यमंत्र्यांनी काढला.पटोलेंना चूक लक्षात येईलभाजपाचे आमदार आशिष देशमुख यांनी वेगळ्या विदर्भावरून मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली होती. मी अद्याप ते वाचलेले नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तर नाना पटोले यांना आपली चूक लवकरच लक्षात येईल, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस