शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवातील बेकायदा होर्डिंगवरील कारवाईची माहिती द्या - न्यायालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2016 04:01 IST

गणेशोत्सव, नवरात्रौत्सव व अन्य कोणत्याही उत्सवांदरम्यान मंडपात बेकायदा होर्डिंग लावू नयेत, असा उच्च न्यायालयाचा स्पष्ट आदेश असतानाही राजकीय पक्षांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

मुंबई : गणेशोत्सव, नवरात्रौत्सव व अन्य कोणत्याही उत्सवांदरम्यान मंडपात बेकायदा होर्डिंग लावू नयेत, असा उच्च न्यायालयाचा स्पष्ट आदेश असतानाही राजकीय पक्षांनी त्याकडे दुर्लक्ष केले. गणेशोत्सवादरम्यान एक लाखाहून अधिक बेकायदा होर्डिंग्स एकट्या मुंबईत लावण्यात आली. त्यामुळे उच्च न्यायालयाने मुंबईसह राज्यातील अन्य महापालिकांनाही बेकायदा होर्डिंग हटवण्यासाठी तातडीने विशेष मोहीम हाती घेण्याचा आदेश दिला. तसेच सर्व महापालिकांनी व राजकीय पक्षांनी बेकायदेशीरपणे होर्डिंग लावण्याऱ्यांवर काय कारवाई केली, याचीही माहिती देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला.
गणेशोत्सवापूर्वी उच्च न्यायालयाने मंडपातच बेकायदेशीरपणे होर्डिंग न लावण्याचा आदेश राजकीय पक्षांना दिला होता. तर महापालिकेला मंडपासाठी व होर्डिंगसाठी स्वतंत्र परवानगी देण्यास सांगितले होते. मंडप उभारण्यास परवानगी दिली असली तरी होर्डिंग लावण्यासाठी वेगळी परवानगी घेण्यात यावी, असे उच्च न्यायालयाने महापालिकेला बजावले होते. तरीही गणेशोत्सवादरम्यान मुंबईत एक लाखाहून अधिक होर्डिंग लावण्यात आली होती, असे सुस्वराज्य संघटनेच्या वतीने अ‍ॅड. उदय वारुंजीकर यांनी न्या. अभय ओक व न्या. ए.के. मेनन यांच्या खंडपीठाला सांगितले.
ही होर्डिंग उतरवण्यासाठी मुंबईसह राज्यातील सर्व महापालिकांनी तातडीने विशेष मोहीम हाती घ्यावी. तसेच नवरात्रीत असे घडणार नाही, याची खबरदारीही सर्व महापालिकांनी घ्यावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले.


बेकायदा होर्डिंगला आळा बसावा यासाठी राजकीय पक्षांनी त्यांची स्वत:ची काय यंत्रणा उभारली आहे, अशी विचारणाही उच्च न्यायालयाने राजकीय पक्षांकडे केली होती. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, समाजवादी पार्टी, आरपीआय (ए) व शिवसेनेने या संदर्भात हमी दिली होती.
सर्व राजकीय पक्षांनी स्वत:ची यंत्रणा उभारली असल्यास आतापर्यंत काय कारवाई केली आहे, याची माहिती देण्याचा आदेश न्यायालयाने राजकीय पक्षांना दिला.

सर्व महापालिकांना १ जानेवारी ते १० आॅक्टोबरपर्यंत किती जणांवर कारवाई करण्यात आली, याची माहिती पुढील सुनावणीत म्हणजेच १५ आॅक्टोबर रोजी देण्याचे निर्देश दिले.
बेकायदा होर्डिंगविरुद्ध साताऱ्याच्या सुस्वराज्य संघटनेने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. तिची व्याप्ती वाढवत न्यायालयाने या याचिकेवर दिलेला आदेश संपूर्ण राज्यासाठी लागू केला.