शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

घटक पक्षांच्या उमेदवारांची माहिती द्या!

By admin | Updated: September 30, 2014 01:02 IST

भाजप पक्षश्रेष्ठींचे जिल्हाध्यक्षांना आदेश

अकोला : महायुती तुटल्यानंतर उमेदवार निश्‍चित करताना उडालेला गोंधळ बघता, भाजपने त्यांच्यासोबत असलेल्या घटक पक्षांच्या नेत्यांकडून दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांची माहिती गोळा करणे सुरू केले आहे. त्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांना तातडीने ही माहिती प्रदेश कार्यालयाकडे पाठविण्याचे आदेश भाजपने दिले असून, संपूर्ण माहिती गोळा झाल्यानंतर कुणाची उमेदवारी कायम ठेवायची आणि कुणाला माघार घ्यायला लावायची, याबाबत निर्णय होणार आहे.भाजप-शिवसेनेची २५ वर्षांची युती यंदाच्या निवडणुकीत संपुष्टात आली. राज्याच्या राजकारणातील ही सर्वात मोठी उलथापालथ आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होण्यास केवळ दोन दिवसांचा अवधी असताना, युती तुटल्यामुळे इच्छुक उमेदवारांची चांगलीच धावपळ झाली. या धाव पळीत महायुतीमध्ये भाजप-शिवसेनेसोबत असलेल्या घटक पक्षांच्या उमेदवारांची फरफट झाली. कोणता मतदारसंघ कोणत्या घटक पक्षाला सोडण्यात आला, याबाबतची निश्‍चित माहितीच नसल्यामुळे, काही मतदारसंघांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाइं (आठवले गट) आणि शिवसंग्रामच्या उमेदवारांनी नामांकन दाखल केले. काही ठिकाणी घटक पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज भरताना, थेट भाजपचा उमेदवार म्हणून अर्ज सादर केले. पश्‍चिम विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यात रिपाइंचे जिल्हाध्यक्ष नरहरी गवई यांनी मेहकर येथून भाजपतर्फे उमेदवारी दाखल केली. खामगाव येथे स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या तालुकाध्यक्षांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. वाशिम जिल्ह्यातील कारंजा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हेमेंद्र ठाकरे यांनी, तर वाशिम मतदारसंघातून रिपाइंचे (आठवले गट) तेजराव वानखेडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अकोला जिल्ह्यात बाळापूर मतदारसंघातून शिवसंग्रामचे नेते संदीप पाटील लोड यांनी भाजपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला असून, अकोला पूर्व मतदारसंघातून रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोक नागदेवे यांचा अर्ज आहे. या उमेदवारांच्या नामनिर्देशनपत्राबाबतची माहिती भाजपच्या जिल्हा कार्यालयाकडून प्रदेश कार्यालयाकडे तातडीने पाठविली जात आहे. घटक पक्षांच्या सर्व उमेदवारांची माहिती गोळा केल्यानंतर कोणत्या मतदारसंघात कुणाची उमेदवारी कायम ठेवायची आणि कुणाला माघार घ्यायला लावायची, याबाबतचा निर्णय पक्षस्तरावर होणार आहे.