शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
3
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
4
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
5
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
6
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
7
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
8
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
9
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
10
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
11
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
12
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
13
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
14
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
15
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
16
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
17
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
19
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
20
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

१५ जूनपर्यंत मदत द्या अन्यथा संघर्ष

By admin | Updated: June 3, 2015 03:16 IST

५० टक्क्यांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जाला सर्वंकष माफी, मराठवाड्यातील फळबागांना वाचविण्यासाठी ३५ हजार हेक्टरी अनुदान,या मागण्यांवर येत्या

मुंबई : ५० टक्क्यांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जाला सर्वंकष माफी, मराठवाड्यातील फळबागांना वाचविण्यासाठी ३५ हजार हेक्टरी अनुदान,या मागण्यांवर येत्या १५ जूनपर्यंत सरकारने निर्णय घेतले नाहीत तर रस्त्यावर उतरुन संघर्ष केला जाईल, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीत दिला.पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधिमंडळ नेते अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदींनी मुख्यमंत्री फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली. पवार यांनी मराठवाड्यात ३ दिवस दौरा करून दुष्काळाची नुकतीच पाहाणी केली आहे. या पाहाणीतून समोर आलेले वास्तव त्यांनी मुख्यमंत्र्यासमोर मांडले. शासनाने ठरवून दिलेल्या प्रतिलिटर २० रुपये दराने राज्य सहकारी दुग्ध व्यवसायिकांकडून दूध खरेदी करावे,टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करताना पशुधनाचा विचार करावा, खरीप पिकाचा विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळावी आदी मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले. साखरेच्या एफआरपीबाबत निर्णय घेण्यात दिरंगाई होत असल्याकडे अजित पवार यांनी लक्ष वेधले. (विशेष प्रतिनिधी)