शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

आरोप सिद्ध करून दाखवा; राजकारणातून नवृत्त होईल

By admin | Updated: May 11, 2014 00:33 IST

खान्देश विकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील करार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिलेला निधी हे दोन्ही आरोप एकनाथराव खडसे यांनी सिद्ध करून दाखविल्यास राजकारणातून कायमस्वरूपी नवृत्त होईल

जळगाव : खान्देश विकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील करार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिलेला निधी हे दोन्ही आरोप एकनाथराव खडसे यांनी सिद्ध करून दाखविल्यास राजकारणातून कायमस्वरूपी नवृत्त होईल व त्यांची माफी मागेल, मात्र आरोप सिद्ध करू न शकल्यास खडसे यांनी जनता, प्रशासन व न्यायालयाची  जाहीर माफी मागावी, असे जोरदार आव्हान खान्देश विकास आघाडीचे अध्यक्ष रमेशदादा जैन यांनी खडसे यांना शनिवारी दिले. 
लोकसभा निवडणुकीत खाविआने राष्ट्रवादी काँग्रेसला मदत केल्याची परतफेड म्हणून घरकूल प्रकरणातील आरोपींना जामीन मिळावा यासाठी विशेष सरकारी वकील अँड.निर्मलकुमार सूर्यवंशी व अँड.प्रवीण चव्हाण यांची नियुक्ती रद्द केल्याचा आरोप खडसे यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत केला होता. त्याला रमेशदादा जैन यांनी शनिवारी प्रत्युत्तर दिले.
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, अँड.सूर्यवंशी व सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून प्रवीण चव्हाण यांची नियुक्ती होण्यासाठी खडसे यांनी २२ नोव्हेंबर २0१२ रोजी  शासनाला पत्र दिले होते. शासनाने ते मान्य करून त्यांची नियुक्ती केली व तेव्हापासून ते आजपर्यंत विशेष सरकारी वकील म्हणून कामकाज पाहत होते. हे मात्र खडसे सोयीस्करपणे विसरून राजकीय षडयंत्र असल्याचा खोटा आरोप करीत आहे. त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. 
आमचा न्यायालय, प्रशासन व राज्यकर्त्यांवर पूर्ण विश्‍वास आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निकालाच्या आधारावर शासनाने विशेष सरकारी वकीलांसंदर्भातील भूमिका घेतल्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी स्पष्ट केले आहे. याचा अर्थ खडसे हे दिशाभूल करीत असून, सोयीचे, सुडाचे व व्यक्तीद्वेषाचे आणि समाजामध्ये तिढा निर्माण करणारे राजकारण करीत आहेत, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.