शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
3
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
4
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
5
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मधूनही दीपिका पादुकोण बाहेर? मेकर्सने केलं स्पष्ट
6
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
7
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
8
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
9
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
10
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
11
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
12
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
13
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
14
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
15
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
16
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
17
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
18
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
19
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
20
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात निषेध मोर्चांना हिंसक वळण!

By admin | Updated: November 4, 2014 02:36 IST

पोलीस हतबल अन् बेखबर पदाधिकाऱ्यांची भाषणे आणि मोर्चेकऱ्यांच्या घोषणाबाजीतून मोर्चाला हिंसक वळण लागण्याची चिन्हे दिसत होती़

नाशिक/जळगाव : अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडे येथील दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ नाशिक, जळगाव आणि सांगलीत विविध संघटनांनी सोमवारी काढलेल्या मोर्चांना हिंसक वळण लागले़ यात अनेक वाहनांची तोडफोड, दुकानांवर दगडफेक केल्याची घटना घडली़ दरम्यान कोल्हापूरमध्ये श्रमिक मुक्ती दलातर्फे मोर्चा काढण्यात आला.पोलीस हतबल अन् बेखबर पदाधिकाऱ्यांची भाषणे आणि मोर्चेकऱ्यांच्या घोषणाबाजीतून मोर्चाला हिंसक वळण लागण्याची चिन्हे दिसत होती़ मात्र, याबद्दल पोलीस पूर्णपणे बेखबर असल्याचे दिसून आले़ फुले मार्केटजवळ मोर्चाला हिंसक वळण लागले़ मोर्चेकऱ्यांना येथेच अडविले असते, तर नासधुस रोखता आली असती, अशी चर्चा रहिवाशांत सुरू होती़ नाशकात बसेसवर दगडफेकजातीय अत्याचारविरोधी कृती समिती व विविध संघटनांनी काढलेल्या धिक्कार मोर्चास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़ दरम्यान, कार्यकर्त्यांनी मोर्चा मार्गावरील दुकाने जबरदस्तीने बंद करण्याचा प्रयत्न केला, तसेच महात्मा गांधी रोडवर दोन दुचाकी ढकलून दिल्या़ यामध्ये कोणीही जखमी झाले नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले़ मोर्चाच्या समारोपानंतर मात्र नवीन सीबीएस परिसरात कार्यकर्त्यांनी तीन बसेसवर दगडफेक करीत मोटरसायकलींची तोडफोड केली़ (लोकमत न्यूज नेटवर्क)