शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

पृथ्वीराज चव्हाण आयसीयूमधील पेशंटप्रमाणे अस्थिर - उद्धव ठाकरे

By admin | Updated: September 15, 2014 11:03 IST

सुरक्षित मतदारसंघ मिळत नसल्याने पृथ्वीराज चव्हाण यांचे मन अतिदक्षता विभागातील पेशंटप्रमाणे अस्थिर बनले असल्याची टीका शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १५ -  सुरक्षित मतदारसंघ मिळत नसल्याने पृथ्वीराज चव्हाण यांचे मन अतिदक्षता विभागातील पेशंटप्रमाणे अस्थिर बनले असल्याची टीका शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली आहे. सामनाच्या अग्रलेखातून पृथ्वीराज चव्हाणांवर टीकास्त्र सोडण्यात आले असून 'अतिदक्षता विभागातील पेशंट अनेकदा अर्धग्लानीत जाऊन असंबद्ध बरळतो तसे काहीसे राज्याच्या मावळत्या मुख्यमंत्र्यांचे झाले आहे' असल्याचे लेखात म्हटले आहे. 
शनिवारी एका मुलाखतीदरम्यान पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्धव ठाकरेंना सरकार चालवण्याचा अनुभव नाही, १९९५ मध्ये भाजप - सेनेचे सरकार आले तेव्हा उद्धव यांचा सरकारमध्ये सहभाग नव्हता, असा टोमणा मारला होता. त्यामुळे खवळलेल्या उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना खडे बोल सुनावले आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांचे हे विधान म्हणजे 'लोका सांगे ब्रह्मज्ञान' अशा म्हणीप्रमाणे असून ते जेव्हा राज्यात मुख्यमंत्री बनून आले तेव्हा त्यांच्याकडे कोणत्या अनुभवाची डिग्री होती? असा सवाल विचारला आहे. मुख्यमंत्र्यांना तेव्हा सर्व तालुके माहीत नव्हते अथवा पश्‍चिम महाराष्ट्रातील स्वपक्षीय आमदारांची नावेही माहीत नव्हती. केंद्रातील राज्यमंत्रीपदाची कारकुनी हा जर अनुभव असेल तर मंत्रालयातील ‘डेस्क ऑफिसर’चा अनुभव जास्त म्हणावा लागेल, अशी टीका लेखात करण्यात आली आहे. 
ज्यांनी अनुभवाचे ढोल वाडवले, त्या सर्वांनी देशाचे व राज्याचे दिवाळेच काढले. पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याची गादी गरम केली, मात्र त्याचा फायदा ना गादीला झाला ना महाराष्ट्राला असे सांगत गादीत फक्त भ्रष्टाचाराचे ढेकूण झाल्याचे लेखाच म्हटले आहे. हे ढेकूण मारण्यासाठी येत्या निवडणुकीत जनता फवारणी करणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अडीचेक वर्षांच्या अनुभवाचे सर्टिफिकेट आता कायमचे ‘फ्रेम’ करून घरीच लावून ठेवा असा खोचक सल्लाही त्यांनी दिला आहे.