शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 17:31 IST

Maharashtra Election 2024: राहुल गांधी यांच्याकडून प्रचारसभांमध्ये संविधानाची प्रत दाखवली जाते. त्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. आता पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रश्न विचारला आहे. 

Congress Devendra Fadnavis: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीतही संविधान बदलाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडून महाराष्ट्रातील सभांमध्येही संविधानाची प्रत दाखवली गेली. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. राहुल गांधींचे संविधान लाल रंगाचे असल्याचे सांगत त्याचा शहरी नक्षलवादाशी संबंध फडणवीसांनी लावला. याच मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीसांना सवाल केला आहे.  फडणवीसांची टीका, पृथ्वीराज चव्हाणांनी दाखवला फोटो

राज्यघटनेची प्रत निळ्या रंगाची आहे, पण राहुल गांधी लाल रंगाची दाखवतात, या देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी फोटो पोस्ट करत उत्तर दिले. 

पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये पंतप्रधान मोदी यांनी कोविंद यांना राज्य घटनेची प्रत भेट देत आहेत. राज्य घटनेचे हे पुस्तक लाल रंगात आहे.

पृथ्वीराज चव्हाणांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल

फोटो पोस्ट करत पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं आहे की, "संविधान हे पवित्र असून तो आपल्या प्रजासत्ताकाचा पायाभूत कायदा आहे. त्याला रंगामध्ये अडकवण्याचा केविलवाणा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करत आहेत हे दुर्दैवी आहे. भारताच्या प्रत्येक नागरिकांकडे संविधान असले पाहिजे. या उद्देशाने राहूल गांधीं संविधानची प्रभावीपणे जनजागृती करीत आहेत."

"ह्याच पॉकेट संविधानाची एक प्रत स्वत: प्रधानमंत्री मोदी यांनी तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेट दिली होती. याबाबत फडणवीस यांचे काय मत आहे?", असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. 

देवेंद्र फडणवीस काय म्हणालेले?

नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, "राहुल गांधींना शहरी नक्षलवाद्यांनी घेरले आहे. राहुल गांधी आता काँग्रेसवाले राहिलेले नाहीत. भारतीय राज्यघटना निळ्या रंगाची असताना, ते लाल रंगात असलेले राज्यघटनेचे पुस्तक दाखवत असतात. लाल रंग दाखवून ते कोणता संकेत देतात, संदेश देतात?", असा प्रश्न फडणवीसांनी उपस्थित केला होता. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाcongressकाँग्रेस