शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

कैद्यांकडेच तुरुंगाची रखवाली

By admin | Updated: April 7, 2015 04:56 IST

राज्यातील अनेक खुल्या व जिल्हा कारागृहांत सुरक्षेसाठी रात्रीचे पहारेकरी म्हणून कैद्यांची नियुक्ती करण्यात येत असून, सध्या विविध कारागृहांत ४१२ कैदी पहारेकरी

नीलेश शहाकार, बुलडाणाराज्यातील अनेक खुल्या व जिल्हा कारागृहांत सुरक्षेसाठी रात्रीचे पहारेकरी म्हणून कैद्यांची नियुक्ती करण्यात येत असून, सध्या विविध कारागृहांत ४१२ कैदी पहारेकरी म्हणून काम करीत आहेत़ त्यामुळे कारागृहांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून पाच खतरनाक कैदी पळून जाण्याची घटना गेल्या आठवड्यात घडली़ त्यानंतर कारागृहाच्या सुरक्षेचे हे वास्तव समोर आले आहे़ कारागृहांमध्ये कैद्यांना विविध व्यवसायाभिमुख उद्योगांत गुंतविण्यात येते. तर ज्या कैद्यांना अक्षरओळख नसते, त्यांच्याकडे कारागृहात रात्र पहारेकरी, स्वच्छता, कारागृह दुरुस्ती, स्वयंपाक अशी कामे सोपवण्यात येतात. या विविध कामांसाठी राज्यातील मध्यवर्ती, खुल्या आणि जिल्हा अशा ४७ कारागृहांत सध्या १,५५८ कैद्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी सुरक्षेसाठी प्रत्येक कारागृहात पोलीस कर्मचारी तैनात असतात. मात्र कारागृहात असणाऱ्या ज्या सेल (वार्ड) मध्ये सदोष कैद्यांना ठेवले जाते, त्या विस्तारित वार्डाच्या ठिकाणी रात्रीच्या वेळी पहारेकरी म्हणून ज्येष्ठ कैद्याची नियुक्ती करण्यात येते. मात्र या कैदी पहारेदारांची विश्वनीयता संपुष्टात आली तर कारागृहांची सुरक्षा धोक्यात येऊ शकते.