शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
3
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
4
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
5
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मधूनही दीपिका पादुकोण बाहेर? मेकर्सने केलं स्पष्ट
6
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
7
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
8
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
9
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
10
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
11
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
12
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
13
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
14
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
15
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
16
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
17
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
18
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
19
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
20
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेआधीच प्रचाराची धामधूम

By admin | Updated: February 2, 2015 04:44 IST

बदलापूर पालिकेच्या निवडणुका एप्रिलमध्ये होणार असल्या तरी या निवडणुकीत एकमेकांविरोधात लढण्यासाठी भाजपा व शिवसेनेने जय्यत तयारी सुरू केली आहे

पंकज पाटील, बदलापूरबदलापूर पालिकेच्या निवडणुका एप्रिलमध्ये होणार असल्या तरी या निवडणुकीत एकमेकांविरोधात लढण्यासाठी भाजपा व शिवसेनेने जय्यत तयारी सुरू केली आहे. भाजपाने ‘आमदार आपल्या दारी’ हे अभियान राबवित मतदारांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. तर शिवसेनेने कार्यकर्ता मेळाव्यातून कार्यकर्त्यांना संघटित करण्याचे काम सुरू केले आहे. कुळगाव-बदलापूर नगर परिषद निवडणुकीसाठी आरक्षणाची सोडत निघाल्यावर आता इच्छुकांनी आपले प्रभाग निश्चित करण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे निवडणुकीआधीच वातावरणनिर्मिती करण्यासाठी दोन प्रमुख पक्ष कामाला लागले आहेत. बदलापुरात शिवसेना आणि भाजपामध्येच खरी लढत असल्याने या दोन पक्षांनी कंबर कसली आहे. आचारसंहिता लागू झाल्यावर प्रचाराला मर्यादा येणार असल्याने भाजपाने आमदार किसन कथोरे यांच्या नेतृत्वाखाली मतदारांच्या गाठीभेटी घेण्याचे आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्याचे काम सुरू केले आहे. आमदार आपल्या दारी या मोहिमेअंतर्गत भाजपाने आपला प्रचार सुरू केला आहे. प्रत्येक प्रभागनिहाय हा प्रचार होत आहे. दुसरीकडे शिवसेनेने आपली ताकद आणि सत्ता अबाधित ठेवण्यासाठी शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली तयारी सुरू केली आहे. कार्यकर्ता मेळावा, पक्ष कार्यालय उभारणे, सांस्कृतिक कार्यक्रम आणि बदलापूर महोत्सवाच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. प्रत्येक प्रभागात पक्षाचे प्रचार कार्यालय उभारण्यात येत आहे. राष्ट्रवादी कमकुवत दिसत असली तरी पक्ष जिवंत ठेवण्याचा प्रयत्न शहर प्रमुख कालीदास देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. पालिकेच्या धोरणांविरोधात मोर्चे काढून मतदारांना जागृत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मनसे, काँग्रेस प्रचारात कुठेच दिसत नाही. (प्रतिनिधी)