शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र विदर्भासाठी आता पंतप्रधानांना साकडे

By admin | Updated: August 14, 2014 01:23 IST

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच विनंती करण्यात येणार आहे. स्वतंत्र विदर्भासाठी आंदोलनरत ‘जनमंच लढा विदर्भाचा’ या संघटनेच्यावतीने येत्या

वादा पुरा करो : जनमंचचे २० ला प्रतिकात्मक आंदोलन नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच विनंती करण्यात येणार आहे. स्वतंत्र विदर्भासाठी आंदोलनरत ‘जनमंच लढा विदर्भाचा’ या संघटनेच्यावतीने येत्या २० आॅगस्ट रोजी ‘वादा पुरा करो’ या शिर्षकांतर्गत व्हेरायटी चौकात प्रतिकात्मक आंदोलन करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या २१ आॅगस्ट रोजी नागपूरच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यानिमित्त जनमंचच्या धरमपेठ येथील कार्यालयात बुधवारी स्वतंत्र विदर्भाच्या आंदोलनासंबंधी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर उपरोक्त आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. १९९७ मध्ये भुवनेश्वर येथील भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अधिवेशनात स्वतंत्र विदर्भ राज्याचा ठराव पारित करण्यात आला होता. सत्तेत आल्यावर आम्ही स्वतंत्र विदर्भ राज्य देऊ, असा ठराव मंजूर झाला होता. भाजपाची सत्ता आता केंद्रात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या २१ आॅगस्ट रोजी नागपूर दौऱ्यावर येत आहेत. त्यानिमित्त स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांना भुवनेश्वरमध्ये दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देणे आणि ते पूर्ण करण्याची विनंती करण्यात येईल. हे आंदोलन पूर्णपणे प्रतिकात्मक राहणार आहे. यात कुठलेही शक्तिप्रदर्शन होणार नाही. भुवनेश्वरमध्ये पार पडलेल्या ठरावाचे प्रतीक तयार करण्यात येईल. ते व्हेरायटी चौकातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर उभे करून ‘वादा पुरा करो’ अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करण्यात येईल. यात केवळ प्रत्येक जिल्ह्यातील प्रतिनिधी सहभागी होतील, असे बैठकीत ठरविण्यात आले. या बैठकीत जनमंचचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर यांच्यासह चंद्रकांत वानखडे, प्रा. शरद पाटील, सुरेश शिंदे, हरीष इथापे, प्रकाश इटणकर, चंद्रकांत खंडेलवाल, डॉ. सुरेश ब्राह्मणकर, अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, अ‍ॅड. वसुसेन देशमुख, जुगल कोठारी, राम आखरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)