शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
3
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

मसापच्या कारभारावर बरसले अध्यक्षच!

By admin | Updated: October 2, 2015 03:47 IST

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) वार्षिक सर्वसाधारण सभेत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व अध्यक्ष प्र. चिं.

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) वार्षिक सर्वसाधारण सभेत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व अध्यक्ष प्र. चिं. शेजवलकर यांनी चार वर्षांच्या नाराजीला वाट करून देत कार्याध्यक्ष डॉ. माधवी वैद्य यांच्या कारभाराची चिरफाड केली. अध्यक्ष म्हणजे अडगळ असे कार्याध्यक्षांना वाटत असावे, म्हणूनच त्यांनी गेली चार वर्षे मला खड्यासारखे बाजूला ठेवले, असा थेट आरोप शेजवलकर यांनी केला.सर्वसाधारण सभेत परिषद पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर सदस्यांनी तर आरोप केलेच; पण शेजवलकर यांनीही कार्याध्यक्षांच्या कामकाजावर बोट ठेवले. परिषदेच्या कारभाराचा उबग आल्यामुळेच एक वर्षात राजीनामा दिल्याचे प्रा. द. मा. मिरासदार यांनी आपल्याला सांगितले होते, असा गौप्यस्फोट करीत शेजवलकर म्हणाले, की मला अध्यक्षपदाचा लोभ नाही. माझ्याही मनात राजीनामा देण्याचा विचार आला होता. परिषदेने साडेचार वर्षात साहित्यविषयक उपक्रम राबविले नाहीत. साताऱ्याचे रवींद्र बेडकीहाळ आणि चाळीसगावचे प्राचार्य तानसेन जगताप यांनी समस्यांना वाचा फोडली. त्यावर चर्चा सुरू असतानाच शेजवलकर यांनीही मनातील खदखद व्यक्त केली. त्यांनी परिषदेच्या अंतर्गत कारभाराबाबत समाधानी नसल्याचे सांगितले. परिषदेच्या कारभाराविषयी अनेकांनी प्रत्यक्ष भेटून तसेच पत्ररुपाने नाराजी कळविल्याचे सांगितले. सभेला डॉ. माधवी वैद्य यांची उपस्थिती आवश्यक होती. मोतीबिंदूची शस्त्रक्रिया पुढे ढकलता आली असती. त्या उपस्थित असत्या तर त्यांना सदस्यांच्या भावना कळाल्या असत्या, असेही त्यांनी नमूद केले.साहित्य महामंडळाचे अध्यक्षपद मिळायला हवे होते; पण मिळाले नाही. त्या विषयी तक्रार नाही. महामंडळाचे अध्यक्षपद मिळविण्याचा तुमचा अधिकार नाही, तुमचा काही संबंध नाही, असे सुनाविण्यात आले होते, अशी आठवण त्यांनी सांगितली. परिषदेकडे महामंडळ असताना साहित्यसंमेलन भरविण्यापलिकडे काय केले असा प्रश्न उपस्थित करून मराठी शाळांच्या दुरवस्थेबाबत, शिक्षकांच्या प्रश्नांबाबत आवाज उठवायला हवा होता. साहित्याकडेही दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे साहित्यिकही परिषदेत येत नाहीत. ज्येष्ठांना बोलवा, त्यांचा सल्ला घ्या, अशी सूचनाही शेवटी शेजवलकर यांनी केली. शेजवलकर यांनी केलेल्या वक्तव्यांचे काही जणांनी समर्थन केले तर योगेश सोमण यांच्यासह काहींनी निषेध केला. काही सदस्यांमध्ये हमरीतुमरी झाली.