विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला : व्यवस्थापकीय अभ्यासक्रमांना पुन्हा स्थगिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 01:06 PM2019-08-17T13:06:26+5:302019-08-17T13:10:22+5:30

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला अभ्यासक्रम सुरू होणे अपेक्षित असताना यावर्षी काही तांत्रिक कारणांमुळे या प्रवेशप्रक्रियेला स्थगिती मिळाली आहे.

Predicting the future of students: Re-stopping managerial courses | विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला : व्यवस्थापकीय अभ्यासक्रमांना पुन्हा स्थगिती

विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला : व्यवस्थापकीय अभ्यासक्रमांना पुन्हा स्थगिती

Next
ठळक मुद्देतंत्र शिक्षण संचालनालयाचा हलगर्जीपणाइंटर्नशिपसाठीसुद्धा वेळ मिळणार नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे

पुणे : व्यवस्थापकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आजूनही संपली नाही. पुन्हा या प्रवेश प्रक्रियेला स्थगिती मिळाली आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला अभ्यासक्रम सुरू होणे अपेक्षित असताना यावर्षी काही तांत्रिक कारणांमुळे या प्रवेशप्रक्रियेला स्थगिती मिळाली आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. त्याची सुनावणी २८ ऑगस्टला होणार आहे. मुंबईतील जमनालाल बजाज महाविद्यालयात प्रवेशाबद्दल झालेल्या गोंधळामुळे आणि तंत्र शिक्षण संचालनालयाने केलेल्या हलगर्जीपणामुळेच अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. 
बजाज महाविद्यालयाने मुंबई विद्यापीठाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे प्रवेश देणे आवश्यक होते. परंतु स्थानिक विद्यार्थ्यांना ७० टक्के जागा आरक्षित करून प्रवेश दिले. त्यामुळे इतर विद्यपीठांतील विद्यार्थ्यांनी या विरोधात न्यायालयात धाव घेतली. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाकडून इतर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मिळालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द होणार असल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. परंतु यापूर्वीदेखील सुनावणीच्या तारखा मिळाल्या असून, दिलेल्या तारखेलाच सुनावणी होईल याची कोणतीही शाश्वती नाही, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. 
या व्यवस्थापकीय अभ्यासक्रमाबरोबर असलेल्या ‘व्यवस्थापकीय पदविका’ (पीजीडीएम) अभ्यासक्रमाच्या तासिका सुरु होऊन एक महिना झाला आहे. आमच्या प्रवेशाबद्दल अजून काहीच हालचाल नाही. त्यामुळे प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. या सुनावणीनंतर जरी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली तरी अभ्यासक्रम सुरु व्हायला १५ दिवस लागतील. डिसेंबर महिन्यात परीक्षा असल्याने अभ्यासक्रम पूर्ण करण्याला दीड महिनाच मिळेल. यामध्ये अभ्यासक्रम पूर्ण होऊच शकत नाही. तसेच इंटर्नशिपसाठीसुद्धा वेळ मिळणार नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. 
........
* अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी नोकऱ्या सोडल्या आहेत. परंतु आता तीन महिन्यांपासून त्यांना घरीच बसून राहावे लागले आहे. 
* काही विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक कर्ज देखील काढले आहे. त्यांनी आता काय करायचे, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.  
.......
* गेली तीन महिने आम्ही या प्रवेशप्रक्रियेच्या गोंधळात अडकलेले आहोत. आजही आम्हाला प्रवेशाबद्दल काहीच शाश्वती मिळालेली नाही. या संदर्भात शिक्षणमंत्र्यांना अनेक ट्विट आणि ई-मेल केले आहेत परंतु त्यांनी कशालाही उत्तर दिलेले नाही. - योगेश गुजर, विद्यार्थी 
आम्हाला प्रवेशप्रक्रियेसंदर्भात कुठलीही अधिकृत माहिती मिळत नसल्याने प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. महाविद्यालयाला विचारले तर त्यांना काहीच कल्पना नसते. तंत्रशिक्षण विभागाच्या मदतकार्य संपर्कावर फोन केला तर एकही नंबर चालू नाही.  - शर्वरी राज, विद्यार्थिनी 

Web Title: Predicting the future of students: Re-stopping managerial courses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.