हिंदी सक्तीवरून महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक वाद उफाळून आल्यानंतर राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी मुंबईत नमाज पठण मराठी करण्याबद्दल विधान केले होते. नितेश राणे यांच्या या विधानानंतर एआयएमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पलटवार केला. ओवेसींनी नितेश राणेंच्या जुन्या ट्विटच्या मुद्द्यावर बोट ठेवत त्यांना घेरलं.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
हिंदी-मराठी भाषेच्या वादावर बोलताना मंत्री नितेश राणे यांनी मराठी सक्तीचीच असली पाहिजे म्हटले. काँग्रेसकडून अमराठी भाषिकांना मराठी शिकवण्याचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याबद्दल राणे म्हणाले, विरोधी पक्षांनी मुस्लिमांना सांगितले पाहिजे की, मशिदींमध्ये अजान पठण होते, अजानही मराठीतून झाली पाहिजे.
वाचा >>“ST महामंडळात काय चाललेय हे मलाच माहिती नाही”; खुद्द प्रताप सरनाईक उद्विग्न
मदरशांमध्येही मराठी सक्तीची करण्यात आली पाहिजे. मराठीतून शिक्षण दिले गेले, तरच तिथे खरे शिक्षण सुरू होईल. नाहीतर तिथून केवळ बंदूकाच निघतील.
नितेश राणेंच्या विधानावर ओवेसी काय बोलले?
मंत्री नितेश राणेंच्या विधानाबद्दल जेव्हा असदुद्दीन ओवेसी यांना विचारण्यात आले; तेव्हा ते म्हणाले, "जर तुम्ही त्यांचे जुने ट्विट बघितले, तर तुम्हाला दिसेल की ते कसे तबलिगी जमातच्या संमेलनाचे स्वागत करताना दिसतील", असा पलटलवार ओवेसींनी राणेंवर केला.
काँग्रेस काय म्हणाली?
राणेंच्या विधानावर काँग्रेसने म्हटले की, मदरशांमध्ये हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषा शिकवल्या जातात. काही मदरशांमध्ये मराठी भाषाही शिकवली जाते. पण, अजान अरबी भाषेमध्ये दिली जाते. भाजपचे नेते धर्म आणि भाषा या मुद्द्यांवरून राजकारण करू पाहत आहेत.