शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

“संजय राऊतांनी फुकटचा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला असता तर...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2021 20:01 IST

संजय राऊत यांनी (Sanjay Raut) आपल्या रोखठोक सदरातून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. याला भाजपने प्रत्युत्तर दिले आहे.

ठळक मुद्देसंजय राऊत यांना भाजपकडून प्रत्युत्तरसंजय राऊत यांनी फुकटचा सल्ला मुख्यमंत्री ठाकरेंना द्यावा - दरेकरकाँग्रेसपेक्षा दीट पटींनी अर्थव्यवस्थेचा विकास - दरेकर

मुंबई: देशात कोरोनाची परिस्थिती गंभीर आणि भीतीदायक होताना पाहायला मिळत आहे. कोरोना लस, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स, ऑक्सिजन यांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत असल्याचे पाहायला मिळत आहे. ऑक्सिजन कमतरतेमुळे अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले. या पार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्र सरकार एकमेकांवर टीका करताना दिसत आहे. तर, राज्यातील परिस्थितीवरून भाजप ठाकरे सरकारवर टीका करताना दिसत आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी फुकटचा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना द्यावा, असा टोला भाजपकडून लगावण्यात आला आहे. (pravin darekar replied sanjay raut over rokthok statement about corona and economy)

संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक सदरातून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. याला भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था सक्षम ठेवण्यासाठी वीस लाख कोटींच पॅकेज जाहीर केले होते. संजय राऊत यांनी अशा प्रकारचा फुकटचा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना द्यावा. त्यामुळे महाराष्ट्राला गटांगळ्याच काय, त्यापेक्षा दुर्दैवी असणाऱ्या अर्थव्यस्थेला नीट गती देता येईल, असा टोला दरेकर यांनी लगावला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

ऑक्सिजनसाठी केंद्राने दिलेला कोट्यवधीचा निधी कुठे गेला? भाजपचा सवाल

काँग्रेसपेक्षा दीट पटींनी आर्थिक विकास

अर्थव्यवस्थेच्या ज्ञानाची संजय राऊत यांनी उजळणी करण्याची आवश्यकता आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये गेल्या १० वर्षांत जी प्रगती करू शकले नाहीत, ती प्रगती पंतप्रधान मोदींनी दीडपट गतीने गेल्या ५ वर्षांमध्ये केली. मोदींनी देश अर्थव्यवस्थेत प्रगतीकडे नेला. याचे भान संजय राऊत यांना नाही किंवा त्यांना ते समजून घ्यायचे नाही, असे प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

 केंद्राकडून महाराष्ट्राला सर्वाधिक १७८५ मेट्रीक टन ऑक्सिजन: देवेंद्र फडणवीस

फुकटचा सल्ला मुख्यमंत्री ठाकरेंना द्यावा

संजय राऊत यांनी अर्थव्यवस्थेविषयीचे सल्ले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी द्यावेत. कोरोनाच्या संकटात जगाची अर्थव्यवस्था कोलमडलेली असताना पंतप्रधान मोदी यांनी देशाचा विकासदर फक्त वजा ८ टक्क्यांपर्यंत ठेवला. संजय राऊत केंद्रीय आणि देशपातळीवरचे नेते असल्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेविषयी त्यांना चिंता करावीशी वाटत नाही, असा दावाही दरेकर यांनी केला.

पीएम केअर्स फंडातून ५५१ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणार; केंद्राची घोषणा

दरम्यान, कोरोना महामारीने देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. देशातील ६० टक्के कामगार बेकार झाले आहेत. राष्ट्रीय उत्पन्न दोन तृतीयांशने खाली आले आहे. आपले राज्यकर्ते मात्र उदासीन आणि आत्मसंतुष्ट आहेत, असे सांगतानाच देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आहेत. अशा संकटसमयी एखादा नवा मनमोहन सिंग निर्माण करून त्याच्या हाती देशाची अर्थव्यवस्था सोपवणे गरजेचे आहे, अशी टीका संजय राऊत यांनी रोखठोकमधून केली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसEconomyअर्थव्यवस्थाSanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाpravin darekarप्रवीण दरेकरBJPभाजपाPoliticsराजकारण