Oxygen Crisis: पीएम केअर्स फंडातून ५५१ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणार; केंद्राची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 03:47 PM2021-04-25T15:47:27+5:302021-04-25T15:49:27+5:30

Oxygen Crisis: आता केंद्र सरकारने एक मोठी घोषणा केली आहे.

oxygen crisis pm cares fund has given approval for 551 dedicated medical oxygen generation plants | Oxygen Crisis: पीएम केअर्स फंडातून ५५१ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणार; केंद्राची घोषणा

Oxygen Crisis: पीएम केअर्स फंडातून ५५१ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणार; केंद्राची घोषणा

Next
ठळक मुद्देकेंद्रातील मोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णयपीएम केअर्स फंडातून ५५१ वैद्यकीय ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणारपंतप्रधान कार्यालयाने दिली माहिती

नवी दिल्ली: संपूर्ण देशभरात दुसऱ्या लाटेमुळे कोरोनाचे संकट गहिरे होत असताना रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात चणचण भासू लागली आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेकांनी आपले प्राण गमावल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता केंद्र सरकारने एक मोठी घोषणा केली असून, आता पंतप्रधान केअर्स फंडातून सरकारी रुग्णालयांमध्ये ५५१ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणार येणार आहेत. (pm cares fund has given approval for 551 dedicated medical oxygen generation plants)

पंतप्रधान कार्यालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम केअर्स फंडातून ५५१ मेडिकल ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासू नये. तसेच ऑक्सिजन मुबलक प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. 

यंत्रणा कोलमडली आहे, आता 'जन की बात' करा; राहुल गांधींचे मोदींवर टीकास्त्र

शक्य तितक्या लवकर कार्यवाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्देश दिले की, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प शक्य तितक्या लवकर सुरू केले गेले पाहिजेत. हे वैद्यकीय ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प विविध राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील निश्चित केलेल्या सरकारी रुग्णालयात सुरू केले जाणार आहेत, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

लस उपलब्धतेची खात्री करून मगच लसीकरण केंद्रावर जावे: महापौर

आरोग्य सेवा मजबूत करण्याचे ध्येय

सरकारी रुग्णालयात वैद्यकीय वापराकरिता ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यामागे सार्वजनिक आरोग्य यंत्रणा मजबूत करणे हेच ध्येय असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे सरकारी रुग्णालयात अचानक ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही. मागणी एवढा ऑक्सिजन पुरवठा नियमित सुरू राहील, असे सांगितले जात आहे. 

“कोरोनाबाबत केंद्राने नेमकी काय उपाययोजना केली, पत्रकार परिषद कधी घेणार?”

दरम्यान, देशात १ मे पासून व्यापक स्तरावर लसीकरण केले जाणार असताना दुसरीकडे कोरोना दिवसेंदिवस अधिकाधिक भीषण होऊ लागला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ३ लाख ४९ हजार ६९१ नव्या करोनाबाधितांची भर पडली असून, तब्बल २७६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत भारतात झालेल्या मृतांची संख्या १ लाख ९२ हजार ३११ इतकी झाली आहे. देशात बरे झालेल्या रुग्णांची संख्या देखील वाढली असून, देशात करोनाचे एकूण २६ लाख ८१ हजार ७५१ रुग्ण उपचाराधीन आहेत.
 

Web Title: oxygen crisis pm cares fund has given approval for 551 dedicated medical oxygen generation plants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.