कलम 370; सक्तीचा घेतलेला निर्णय : प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2019 06:20 PM2019-08-05T18:20:50+5:302019-08-05T18:22:00+5:30

जम्मू काश्मीरच्या जनतेला प्रेमानेही जिंकता आले असते.

Prakash Ambedkar Spoke Section 370 Forced decision | कलम 370; सक्तीचा घेतलेला निर्णय : प्रकाश आंबेडकर

कलम 370; सक्तीचा घेतलेला निर्णय : प्रकाश आंबेडकर

googlenewsNext

मुंबई - जम्मू काश्मीरमधील 370 कलम हटवण्याचे विधयेक मोदी सरकारकडून राज्यसभेत ठेवण्यात आले आहे. त्यांनतर राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. कुठे या निर्णयाचे स्वागत होत आहे, तर काही ठिकाणी विरोध. जम्मू काश्मीरच्या जनतेला प्रेमानेही जिंकता आले असते. तर कलम 370 रद्द करण्याचा निर्णय हा चुकीच्या वेळी आणि सक्तीचा आहे. अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी या निर्णयावरून सरकारवर जोरदार टीका केली.

सरकारकडून कलम 370 हटवण्याच्या निर्णयामुळे देशभरात आनंद व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे मात्र विरोधकांनी या निर्णयावर सरकारवर टीका केली आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा मोदी सरकावर जोरदार दिला केली आहे. देश आर्थिक संकटात सापडला आहे. अशावेळी हा निर्णय घेणे चुकीचे आहे. चुकीच्या वेळी सक्तीचा निर्णय घेतला असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी भाजप सरकारवर केला आहे. तसेच भाजप आणि संघाने आपला राजकीय अजेंडा राबवण्यासाठीच कलम 370 हटवण्याच्या निर्णय घेतला असल्याचे सुद्धा आंबेडकर म्हणाले.

जम्मू-काश्मीरच्या विभाजन करण्याची घोषणा करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्या संदर्भातील घटनादुरुस्ती विधेयक राज्यसभेत मांडलं. सरकारच्या या निर्णयामुळं जम्मू-काश्मीर व लडाख हे स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश होणार आहेत. तसेच या वर्षीच्या अखेरपर्यंत काश्मीरमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे.

Web Title: Prakash Ambedkar Spoke Section 370 Forced decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.