शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर अजित पवारांची माफी मागा; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला
2
Rishabh Pant Has Been Ruled Out : रिषभ पंतची न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेतून माघार; कारण...
3
'ठाकरे ब्रँड'चा फायदा उद्धव-राजना होणार? मराठी मतं 'गेम' फिरवणार? सर्व्हेची टक्केवारी समोर
4
WPL 2026 : हरमनप्रीतच्या MI चा विजयी कल्ला! DC ची कॅप्टन जेमिमावर आली स्मृतीसारखी वेळ
5
"उत्तर भारतीयांकडे वाकड्या नजरेने कुणी पाहिले तर..."; भाजपा मंत्री नितेश राणे काय बोलून गेले?
6
शिंदेसेनेला मतदान करा, जैन व्यापाऱ्याच्या मुलाची पोस्ट; भाजपा उमेदवाराच्या पत्नीने दिली धमकी
7
'गणेश नाईक यांची मनस्थिती बिघडली, त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जा', शिंदेसेनेची बोचरी टीका
8
बांगलादेशला लागणार जॅकपॉट! ५०० टक्के टॅरिफच्या टांगत्या तलवारीनं का वाढली भारताची डोकेदुखी?
9
राम मंदिराजवळ नमाज पढणारा अब्दुल अहद शेख कोण? बॅगेत सापडलं असं काही, कुटुंबीय म्हणाले...  
10
PCMC Election 2026: निवडणुका जवळ आल्या की, अनेकांचा कंठ फुटून काहीही बोलतात, दादा आपण रागवायचं नाही - देवेंद्र फडणवीस
11
सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुंबईहून पालघरला आले, पोहायला पाण्यात उतरले आणि एकावर मृत्युने घातली झडप
12
ठाकरे बंधूंच्या 'शिवगर्जनेची' तारीख ठरली! शिवाजी पार्कवर राज ठाकरे कोणता गौप्यस्फोट करणार?
13
शरद पवार अन् अजित पवार एकत्र येणार नाहीत?; प्रफुल पटेल यांच्या विधानानं नव्या चर्चांना उधाण
14
WPL 2026 : अनुष्का शर्माचा ‘पायगुण’! GG ची ‘साडेसाती’ संपली; UP वॉरियर्सकडून ‘ती’ एकटीच लढली
15
मोदी सरकारविरोधात लिखाण करणाऱ्या डॉ. संग्राम पाटील यांना मुंबईत येताच पोलिसांनी घेतलं ताब्यात
16
Holiday for Election: मतदानासाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर, कोणाला लागू असणार?
17
"आमचा जीव घेतला तरीही..."; सुप्रिया सुळे कडाडल्या; भाजपाला इशारा, मुंबईबाबत काय म्हणाल्या?
18
चौफेर टीका, भाजपाची नाचक्की, अखेरीस स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे याने दिला राजीनामा
19
Video - ओडिशामध्ये ९ सीटर चार्टर्ड प्लेन क्रॅश; पायलटसह ६ जण गंभीर जखमी
20
ICC U19 World Cup Warm up Matches : वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी! शतक अवघ्या ४ धावांनी हुकलं
Daily Top 2Weekly Top 5

“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 20:09 IST

Prakash Ambedkar News: सत्ताधारी म्हणतात की, दिवाळीला मदत देऊ. मात्र, दिवाळीला मदत येणार नाही, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.

Prakash Ambedkar News:राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाने ओबीसींचा घात केला. एवढे ओबीसींनी डोक्यात घ्यावे, तरच ओबीसी आरक्षण वाचेल. स्थानिक पातळीवर जे आरक्षण निघत होते, त्यात ओबीसी नेतृत्व पुढे येत होते. आता तेही हातातून जाण्याची शक्यता आहे. नुसते राजकीय आरक्षण जाणार नाही, तर शैक्षणिक आरक्षण सुद्धा जाईल. त्यामुळे ओबीसींनी वेळीच सावध व्हावे, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. 

एका सभेला संबोधित करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, भाजपाला मतदान दिले म्हणजे ते आपले मालक झाले नाहीत. जर मालक बनण्याचा प्रयत्न केला तर त्यांना आपटल्या शिवाय राहणार नाहीत, हे लक्षात ठेवा. महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली आहे. आता शेतकरी विचार करत आहे की, आम्हाला जी खावटी मिळायची ती यावेळी मिळाली नाही. घरातील सगळे वाहून गेले आहे, जगण्याचा प्रश्न उभा राहिला आहे, अशी टीका आंबेडकरांनी केली. 

मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का? 

भाजपा, आरआरएस विचारसरणीत मदत हा शब्दच नाही. त्यामुळे आता तरी धडा शिकला पाहिजे. सत्ताधारी म्हणतात की, दिवाळीला मदत देऊ. मात्र, दिवाळीला मदत येणार नाही. गरीब, वंचितांना मदत करण्याचा त्यांचा पायंडाच नाही. शेगाव येथील श्री संत गजानन महाराज ओबीसी समाजातील लाखोंचे श्रद्धास्थान आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत अकोल्यात दर महिन्यात येतात. मात्र, एकदा तरी शेगावला दर्शनासाठी जातात का‌? तर अजिबाज नाही. आता मी बोलल्यावर कदाचित ते शेगांवला जातीलही. पंढरपूरचे नाव मी घेत नाही. कारण पंढरपूर दूर आहे. परंतु, ते ज्या ठिकाणी येतात, तेथून गजानन महाराजांचे ठिकाण ३५ किमीवर आहे, असे आंबेडकर म्हणाले.

दरम्यान, दलित, वंचित आदिवासी समाजातील उच्चशिक्षित अनेक हुशार तरुणांचा गेल्या १० वर्षात जातीयवादी लोकांनी जीव घेतला. त्यांची प्रगती मनुवाद्यांचा डोळ्यात खुपत होती, त्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली, असा आरोप सुजात आंबेडकर यांनी केला.

 

English
हिंदी सारांश
Web Title : RSS-BJP Betrayed OBCs: Ambedkar Questions Bhagwat's Visit to Gajanan Maharaj

Web Summary : Prakash Ambedkar accuses RSS-BJP of harming OBC interests, potentially impacting reservation. He criticizes their lack of support for farmers and questions Mohan Bhagwat's absence from Shegaon's Gajanan Maharaj temple, a key OBC pilgrimage site. Sujat Ambedkar alleges caste-based killings of educated Dalit youth.
टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवतGajanan Maharaj Mandirगजानन महाराज मंदिर