शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

NCP पत्रकार परिषदेच्या आधी नेत्यांची कुजबुज व्हायरल; सुनेत्रा पवारांना कुणी बोलू दिले नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 11:01 IST

विशेष म्हणजे पत्रकार परिषदेच्या आधी जी चर्चा सुरू होती तेच पत्रकार परिषदेत घडले. माध्यमांच्या कॅमेऱ्यात नेत्यांमधील चर्चा व्हायरल झाली.

मुंबई - अजित पवारांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनानंतर रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली आहे. मुंबईत झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात हा निर्णय घेण्यात आला. मात्र या निर्णयानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत राष्ट्रवादी नेत्यांची कुजबुज कॅमेऱ्यात कैद झाली.

राष्ट्रीय अध्यक्ष निवडीनंतर सुनेत्रा पवार यांची पत्रकार परिषद होती. या पत्रकार परिषदेसाठी सर्व माध्यमांचे कॅमेरे लावण्यात आले होते. सुनेत्रा पवार येण्यापूर्वी पत्रकार परिषदेच्या ठिकाणी माईकजवळ राष्ट्रवादीचे काही नेते उपस्थित होते. हे नेते आपसांत कुजबुज करत होते. या नेत्यांमध्ये जे काही ठरले होते. तसेच पत्रकार परिषदेत घडल्याचे चित्र पाहायला मिळाले. या पत्रकार परिषदेत प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवारांना न बोलताच जायला सांगितले. या घटनेचा व्हिडिओ टीव्ही ९ वृत्तवाहिनीने प्रसारित केला आहे.

नेमकं व्हिडिओत काय?

पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी मंचाजवळ सतीश चव्हाण, सरोज अहिरे आणि आनंद परांजपे उपस्थित होते. यावेळी सतीश चव्हाण यांनी मला माहिती होतं आधीच.. त्यावर सरोज अहिरे यांनी दादांजवळ कधी जाऊ देण्याची संधी नाही दिली माणसांनी, वहिनींजवळ तरी जाऊ द्या...त्यापुढे आनंद परांजपे सांगतात की, तुम्ही प्रश्न नका घेऊ, तुमचं बोलून झालं की निघा, त्यानंतर सतीश चव्हाण यांनी हा...हे चांगले केलं...स्पेशली प्रश्न करू नका म्हणा असं म्हटलं. त्या मनस्थितीत नाही, बोलायचे आपले आणि उठायचे..असं आनंद परांजपे यांनी सांगितले. तर हे उलटे पालटे प्रश्न विचारतील ना..असं सरोज अहिरे यांनी विचारले. त्यावर सतीश चव्हाण यांनी प्रेशराईज करतील तेव्हा तुम्ही उठवा, आम्ही इथं बाजूला थांबू असं त्यांनी आनंद परांजपे यांना सांगितले. त्यानंतर या नेत्यांना बोलू नका, माईक सुरू आहे असं सांगितल्यानंतर ते गप्प बसले. 

विशेष म्हणजे पत्रकार परिषदेच्या आधी जी चर्चा सुरू होती तेच पत्रकार परिषदेत घडले. प्रफुल पटेल, सुनेत्रा पवार आणि सुनील तटकरे हे माध्यमांशी संवाद साधण्यासाठी आले. तेव्हा सतीश चव्हाण यांनी सुनेत्रा पवारांना तुमचे स्टेटमेंट तुम्ही करा असं म्हटले. त्यावर त्याच्या पलीकडे आम्ही बोलू असं प्रफुल पटेल यांनी सुनेत्रा पवारांना सांगितले. या पत्रकार परिषदेत प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांनी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. मात्र पत्रकारांनी सुनेत्रा पवारांना प्रश्न विचारला असता तटकरे-पटेल आणि सुनेत्रा पवार तिघेही जागेवरून उठले. त्यावेळी प्रफुल पटेल यांनी तुम्ही निघा असं सुनेत्रा पवारांना सांगितल्याचे ऐकायला आले. त्यानंतर सुनेत्रा पवार निघून गेल्या आणि पटेल-तटकरे यांनी पुन्हा माध्यमांशी संवाद साधला. 

English
हिंदी सारांश
Web Title : NCP leaders' whispers before press conference: Sunetra Pawar silenced?

Web Summary : A video reveals NCP leaders' hushed discussion before Sunetra Pawar's press conference. Concerns were raised about potential tough questions, leading to her being swiftly ushered away by Praful Patel and Sunil Tatkare, preventing her from speaking extensively.
टॅग्स :Praful Patelप्रफुल्ल पटेलsunil tatkareसुनील तटकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेसSunetra Pawarसुनेत्रा पवारAjit Pawarअजित पवार