शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
3
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
4
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
5
१.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश
6
“१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य, अन्यथा परवाने रद्द”: प्रताप सरनाईक
7
अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? अमेरिकेनं सुरू केली नाकेबंदी; भारताला बसणार मोठा फटका?
8
Chanakya Niti: शत्रू समोरून वार करतो, पण मित्र पाठीमागून! धोका टाळण्यासाठी चाणक्य नीतीचे महत्त्वाचे नियम
9
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
10
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
11
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
12
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
13
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
14
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
15
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
16
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
17
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
18
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
19
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
20
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
Daily Top 2Weekly Top 5

पोस्टकार्ड व आंतरदेशीय पत्रांमुळे टपाल खात्याला भूर्दंड

By admin | Updated: August 21, 2015 22:43 IST

पोस्टकार्ड व आंतरदेशीय पत्रांच्या छपाईमागे अनुक्रमे ७.0३ रुपये व ४.९३ रुपयांचे नुकसान.

राम देशपांडे /अकोला : मोबाईल मॅसेजिंग, ई-मेल आणि सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे टपाल खात्यातील प्रचलित पोस्टकार्ड आणि आंतरदेशीय पत्राला उतरती कळा लागली आहे. याचा वापर पूर्वीएवढा राहिला नसला नसून, टपाल खात्याला वर्षाकाठी प्रत्येक पोस्टकार्ड व आंतरदेशीय पत्रांच्या छपाईमागे अनुक्रमे ७.0३ व ४.९३ रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे. हा छपाईखर्च त्यांच्या विक्री किमतीपेक्षा अधिक असल्याने टपाल खात्याला दरवर्षी आर्थिक नुकसान सोसावे लागत असल्याचे दिसून आले आहे. संगणक युगात पाऊल टाकण्यापूर्वी भारतात संदेश वहनाकरिता टपाल खात्याचे पोस्टकार्ड व आंतरदेशीय पत्र प्रचलित होते; मात्र संगणक युगात ई-मेल, मोबाईल मॅसेजिंग आणि सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे डाक विभागाची ही सशक्त माध्यमे काळाच्या ओघात मागे पडू लागली आहेत. आधुनिक युगात क्षणार्धात संदेशवहन करणार्‍या माध्यमांची मागणी वाढल्याने, कधीकाळी संपूर्ण देशवासीयांच्या मनावर अधिराज्य गाजविणार्‍या पोस्टकार्ड आणि अंतर्देशीय पत्रांची मागणी घटली आहे. दुसरीकडे निर्मिती खर्च वाढत असल्याने टपाल खात्याला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लगत आहे. डाकघरांमध्ये वितरित केले जाणारे आंतरदेशीय पत्र, पोस्टकार्ड, पंजीकृत लिफाफे, हवाई पत्र, मोहोर चिन्हांकित लिफाफे, डाक तिकिटांची निर्मिती केंद्र शासनाद्वारे प्रत्येक राज्यात स्थापित करण्यात आलेल्या भारत प्रतिभूती मुद्रणालयात केली जाते. मुंबई, पुणे,औरंगाबाद आणि नागपूर या चार विभागातील डाकघरांमध्ये वितरित केल्या जाणार्‍या या साहित्याची निर्मिती नाशिक येथील भारत प्रतिभूती मुद्रणालयात केली जाते. निर्मितीकरिता लागणारा कागद व रासायनिक द्रव्यांचे दर वाढत चालले आहेत. खर्चाचा मेळ बसविण्याकरिता टपाल खात्याने वर्षांपूर्वी १५ पैसे दराने विकल्या जाणार्‍या पोस्टकार्डाची किमत ५0 पैसे, तर आंतरदेशीय पत्राचे दर ७५ पैशांवरून २.५0 रुपये केली; मात्र टपाल खात्याला २0१३-१४ या आर्थिक वर्षात छपाईसाठी प्रती पोस्टकार्ड ७.0३ रुपये, तर प्रती आंतरर्देशीय पत्राच्या ४.९३रुपये नुकसान सोसावे लागले. या पत्रांच्या मागणीत २0११-१२ आणि २0१२-१३ मध्ये अनुक्रमे ३.३ आणि ५.२ टक्क्यांची घट आढळून आली आहे.