शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मॉल, शोरूमवर अटींची शक्यता

By admin | Updated: April 7, 2015 04:41 IST

गोव्यातील फॅब इंडिया शोरूममध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासोबत घडलेल्या प्रकाराची पुनरावृत्ती शहरात कोठेही, कोणासोबतही घडू नये यासाठी

मुंबई : गोव्यातील फॅब इंडिया शोरूममध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासोबत घडलेल्या प्रकाराची पुनरावृत्ती शहरात कोठेही, कोणासोबतही घडू नये यासाठी मुंबई पोलीस अ‍ॅक्शन प्लॅन आखत आहेत. त्यानुसार मॉल, तयार कपड्यांची छोटी-मोठी शोरूम्स, ट्रायल रूम, चेंजिंग रूम असतील अशा आस्थापना चालकांना काही अटी घातल्या जाऊ शकतात. तसेच अशा घटनांची जबाबदारी थेट चालक, मालकांवर येऊ शकते.गेल्या आठवड्यात शुक्रवारी गोव्याच्या कँडोलीम परिसरातील फॅब इंडिया शोरूममध्ये इराणी कपडे खरेदीसाठी गेल्या होत्या. पसंत पडलेले कपडे घालून पाहण्यासाठी त्या शोरूमच्या ट्रायल रूममध्ये गेल्या. कपडे बदलता बदलता त्यांचे लक्ष ट्रायल रूमबाहेर उंचावर बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हीकडे गेले. हा सीसीटीव्ही ट्रायल रूममधील चित्रण टिपत होता. इराणी यांच्या तक्रारीनंतर स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. गुन्हे शाखेने शोरूममधील चार कर्मचाऱ्यांना या प्रकरणी अटक केली. तसेच शोरूमच्या मालकापासून अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली.अशा प्रकारे चोरून महिलांचे व्हीडीओ रेकॉर्ड करणे, क्लीप काढणे हे मुंबई, ठाणेसारख्या शहरांना नवे नाही. याआधी अशा प्रकारे चोरून चित्रण केल्याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र इराणींबाबत असा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी हा विषय गांभीर्याने घेतल्याचे समजते. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, असे प्रकार रोखण्यासाठी काय करता येईल याबाबत एक अ‍ॅक्शन प्लान लवकरच निश्चित केला जाईल आणि त्याची अंमलबजावणी सुरू केली जाईल. महिला स्वच्छतागृहांपासून ट्रायल रूमपर्यंत अनेक ठिकाणी असे प्रकार घडू शकतात हे लक्षात घेऊन त्या-त्या आस्थापनांच्या मालक, चालकांना नियम व अटी घातल्या जातील. चोरून बसविण्यात आलेले इलेक्ट्रॉॅनिक गॅॅझेट्स जसे सीसीटीव्ही, छुपा कॅमेरा, मोबाइल शोधून काढणारी यंत्रणा (डीप बकिंग इन्स्ट्रूमेंट) बाजारात उपलब्ध आहे. ती बसवून घेतल्यास असे प्रकार टाळता येतील. (प्रतिनिधी)