शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

सनातन आश्रमातील महिला डॉक्टर ‘एसआयटी’च्या ताब्यात

By admin | Updated: September 14, 2016 06:35 IST

पनवेल येथील ‘सनातन’ आश्रमात सापडलेल्या नार्कोटिक औषधांच्या साठ्याप्रकरणी ‘एसआयटी’ने गोवा आश्रमातील महिला डॉक्टर आशा ठक्कर हिला ताब्यात घेतले आहे.

कोल्हापूर : पनवेल येथील ‘सनातन’ आश्रमात सापडलेल्या नार्कोटिक औषधांच्या साठ्याप्रकरणी ‘एसआयटी’ने गोवा आश्रमातील महिला डॉक्टर आशा ठक्कर हिला ताब्यात घेतले आहे. ती वीरेंद्र तावडेच्या सांगण्यावरून आश्रमातील ‘खास’ साधकांना औषधे देत होती. त्यामुळे तिला पानसरे हत्येसंबंधी माहिती असण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने पोलिस तिच्याकडे कसून चौकशी करीत आहेत. तावडेचे बेपत्ता विनय बाबूराव पवारशी घनिष्ठ संबंध होते. पानसरे यांच्या हत्येपूर्वी पवार हा परिसरात संशयितरीत्या फिरत असताना त्याला स्थानिक चार लोकांनी पाहिले आहे. त्यामुळे पोलिसांनी पवारची पत्नी श्रद्धा पवार हिचा जबाब घेतला. तिने २००९ च्या मडगाव-गोवा बॉम्बस्फोटापासून पती बेपत्ता असल्याचे सांगितले, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली. तावडे याच्या चौकशीमध्ये परिस्थितिजन्य पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. तावडेची बेपत्ता बॉक्सर कोल्हापुरात खरेदी केल्याचे उघडकीस आल्याने तिचा शोध घेण्याचे काम पोलिस करीत आहेत. वाशिम येथून तावडेची चारचाकी ट्रॅक्स पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. मडगाव-गोवा येथे २००९ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी रुद्रगौंडा पाटील, सारंग अकोलकर, प्रवीण लिमकर, जयप्रकाश हेगडे व विनय पवार यांनी या ट्रॅक्सचा वापर केला होता. बॉम्बस्फोटाची रंगीत तालीम घेण्यासाठी ते इचलकरंजीहून जतला गेले होते. त्या ठिकाणी प्रात्यक्षिक घेऊन त्यांनी मडगाव येथे बॉम्बस्फोट घेऊन आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या ट्रॅक्सचा वापर पानसरे यांच्या हत्येसाठी करण्यात आल्याचे तपासात पुढे आले. (प्रतिनिधी)विनय पवार तिसरा संशयित पोलिसांनी आतापर्यंत बारा साक्षीदारांचे जबाब नोंदविले आहेत. त्यांना फरार आरोपी सारंग अकोलकर व विनय पवार यांचे फोटो दाखविले असता चार साक्षीदारांनी पवार हा पानसरे राहत असलेल्या परिसरात संशयितरीत्या फिरत असताना आम्ही पाहिले असल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे पानसरे हत्येप्रकरणात समीर गायकवाड, वीरेंद्र तावडेसह तिसरा संशयित म्हणून विनय पवार याचे नाव पोलिसांनी रेकॉर्डवर घेतले आहे. शहरात आठ ठिकाणी फिरविलेतावडे याचे कोल्हापुरात वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य होते, अशी माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यानुसार पोलिसांनी त्याला बंद गाडीतून इचलकरंजी, कोल्हापुरातील साइक्स एक्स्टेंशन, गंगावेश, वारणानगरसह अन्य ठिकाणांच्या घटनास्थळी फिरवून माहिती घेतली. त्या ठिकाणी असलेल्या काही लोकांचेही जबाब घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. श्रद्धा पवारचा जबाब पती विनय पवार हे ‘सनातन’चे कट्टर साधक होते. आम्ही उंब्रज (जि. सातारा) येथे राहत होतो. आमचे लग्नही पनवेल येथील आश्रमात झाले. २००९ पासून पती बेपत्ता आहेत. याबाबत ‘सनातन’च्या साधकांसह वीरेंद्र तावडेकडे चौकशी केली होती; परंतु त्यांनी काहीच माहिती दिली नाही. मडगाव बॉम्बस्फोटासंबंधी पोलिस घरी चौकशीसाठी आल्यानंतर मी माहेरी निघून आले. उंब्रज येथे त्यांचे आई-वडील राहत आहेत. बेपत्ता झाल्यापासून पतीचा आपणाला फोन किंवा कोणताही निरोप नसल्याचे तिने सांगितले. त्यावर पोलिसांनी पतीची बेपत्ता वर्दी पोलिस ठाण्यात का दिली नाहीस, अशी विचारणा केली असता भीतीपोटी दिली नसल्याचे तिने सांगितले. तिने दिलेल्या जबाबाची खात्री केली जात आहे. ती पोलिसांपासून माहिती लपवीत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.