सकारात्मक : राज्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट; चोवीस तासांत ६,७२७ रुग्णांची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 10:05 PM2021-06-28T22:05:25+5:302021-06-28T22:06:35+5:30

Coronavirus Update In Maharashtra : चोवीस तासांत मोठ्या प्रमाणात रुग्णांनी केली कोरोनावर मात. मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्याही घटली.

Positive Significant decline in the number of new corona cases in the state; 6,727 patients registered in 24 hours | सकारात्मक : राज्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट; चोवीस तासांत ६,७२७ रुग्णांची नोंद

सकारात्मक : राज्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट; चोवीस तासांत ६,७२७ रुग्णांची नोंद

Next
ठळक मुद्देचोवीस तासांत मोठ्या प्रमाणात रुग्णांनी केली कोरोनावर मात.मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्याही घटली.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात हाहाकार माजला होता. दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला होता. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्येत घट दिसून आली आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात ६,७२७ रुग्णांची नोंद करण्यात आली.

गेल्या अनेक महिन्यांनंतर राज्यातील रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात ६,७२७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर १०,८१२ रुग्णानी कोरोनावर मात केली आहे. राज्यात गेल्या २४ तासांत १०१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर आता ९५.९९ टक्के झाला आहे. तर राज्यात सध्या १,१७,८७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

 
मुंबईतही रुग्णसंख्या घटली
गेल्या चोवीस तासांत मुंबईत ६०८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर ७१४ रुग्णांनी कोरोनावर मात केली. मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर आता ९६ टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या मुंबईत ८,४५३ रुग्णांवर उपचार सुरू असून रुग्ण दुपटीचा कालावधीही ७२८ दिवसांवर पोहोचला आहे.

Web Title: Positive Significant decline in the number of new corona cases in the state; 6,727 patients registered in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.