नियतकालिकांच्या मागणीला टपाल खात्याकडून सकारात्मक प्रतिसाद; देशभरातील प्रकाशकांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 03:22 PM2020-04-20T15:22:44+5:302020-04-20T15:22:57+5:30

नियतकालिकांचे काम नेहमीच पुढच्या दोन महिन्यांपर्यंतचे तयार असते.

Positive response from the postal department to the demand for periodicals | नियतकालिकांच्या मागणीला टपाल खात्याकडून सकारात्मक प्रतिसाद; देशभरातील प्रकाशकांना दिलासा

नियतकालिकांच्या मागणीला टपाल खात्याकडून सकारात्मक प्रतिसाद; देशभरातील प्रकाशकांना दिलासा

Next
ठळक मुद्देजून २०२० पर्यंत सर्व अंकांचे पोस्टींग सवलतीच्या दरात करण्यात येईल

पुणे: मराठी नियतकालिकांच्या संपादक-प्रकाशक असोसिएशनने केलेल्या मागणीला पोस्ट खात्याने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. जून २०२० पर्यंत सर्व अंकांचे पोस्टींग सवलतीच्या दरात करण्यात येईल, असे टपाल खात्याने कळवले आहे.
असोसिएशनचे अध्यक्ष भालचंद्र कुलकर्णी यांनी ही माहिती दिली. आहे. कोरोना परिस्थितीत प्रचलित सर्व नियम बाजूला ठेवून जून २०२० पर्यंतच्या अंकांचे पोस्टींग सवलतीच्या दरात करावे अशी मागणी असोसिएशनने केली होती. याबाबतच्या आदेशांचे सविस्तर परिपत्रक  केंद्रीय दळणवळण मंत्रालयाच्या पोस्टल विभागाचे उपमहासंचालक अदनान अहमद यांनी जारी केले आहे. त्यामुळे फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील सर्व नियतकालिकांच्या प्रकाशकांना दिलासा मिळाला असल्याचे कुलकर्णी म्हणाले.
नियतकालिकांचे काम नेहमीच पुढच्या दोन महिन्यांपर्यंतचे तयार असते. मात्र सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत सर्वत्र बंद असल्याने नियतकालिके छापणे व त्यांचे वितरण करणे शक्य होणार नाही. मात्र ठरलेल्या नियमानुसार पोस्टींग झाले नाही तर दंड लावला जातो. हा दंड लावू नये, त्याऐवजी लॉकडाऊन नंतरच्या कालावधीत हे अंक पोस्ट केले तरी त्यांना सवलत सुरू ठेवावी अशी संघटनेची मागणी होती. केंद्रीय टपाल खात्याच्या या परिपत्रकानुसार ती मान्य करण्यात आली आहे.  मार्च, एप्रिल व मे महिन्यांचे अंक जून पर्यंत पोस्टींग होणार नसले तरी कोणताही दंड लागणार लागणार नाही.
मार्च पासूनचे सर्व अंक प्रकाशित केले नाही, त्यातील काही वगळल्यास किंवा आवश्यकतेनुसार जोड अंक प्रकाशित केल्यास ते सवलतीच्या दरात स्विकारले जातील. लॉकडाऊननंतरच्या कालावधीत जूनपर्यंत हव्या त्या तारखांना मागील छापलेले अंकांचे पोस्टींग करणे देखील शक्य होणार आहे. यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता लागणार नाही. त्याचबरोबर प्रकाशकांना नेमून दिलेल्या पोस्टाऐवजी सोयीच्या अन्य पोस्टातून देखील नियतकालिकांचे पोस्टींग करण्याची सवलत केंद्रीय टपाल खात्याने दिली असल्याची माहिती कुलकर्णी यांनी दिली.   नियतकालिकांच्या प्रचलित पोस्टींगनियमांना जूनपर्यंत पूर्णपणे स्थगिती देण्यात आली असल्याने प्रकाशकांच्या सर्व मागण्यांची दखल केंर्द्र सरकारने घेतल्याने केंद्रीय दळणवळण मंत्री  रवीशंकर प्रसाद व केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री ना. प्रकाश जावडेकर यांचे असोसिएशनच्या वतीनेआभार व्यक्त करण्यात आले आहेत. 

Web Title: Positive response from the postal department to the demand for periodicals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.