शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण; संजय राठोडांना निर्दोषत्व नाहीच

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 7:14 AM

तपास सुरू असून कोणालाही निर्दोषत्व बहाल करण्यात आलं नसल्याची पोलिसांची माहिती. ७ फेब्रुवारी रोजी पूजा चव्हाणनं केली होती आत्महत्या.

ठळक मुद्देतपास सुरू असून कोणालाही निर्दोषत्व बहाल करण्यात आलं नसल्याची पोलिसांची माहिती.७ फेब्रुवारी रोजी पूजा चव्हाणनं केली होती आत्महत्या.

पुणे : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात तिच्या आई-वडिलांनी नव्याने जबाब नोंदविला असून त्यात कोणाविरुद्ध त्यांची तक्रार नसल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी पूर्ण केल्याचा अहवाल अद्याप सादर केलेला नाही. त्यामुळे तपास बंद करण्यात आलेला नाही. तपास सुरू असून अद्याप कोणालाही  निर्दोषत्त्व बहाल करण्यात आलेले नाही, असे परिमंडळ-५ च्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी सांगितले.

बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण या युवतीने वानवडीतील हेवन पार्क इमारतीतल्या सदनिकेतून उडी मारून आत्महत्या केली होती. ही घटना ७ फेब्रुवारीला घडली होती. या प्रकरणाशी तत्कालिन वनमंत्री संजय राठोड यांचे नाव जोडण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. “पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणाचा तपास बंद (क्लोजर रिपोर्ट) करण्यात आलेला नाही,” असे पोलिसांनी स्पष्ट केले. 

पंधरा दिवसांपूर्वी वानवडी पोलिसांनी पूजाच्या पालकांचा नव्याने जबाब नोंदविला आहे. त्यांनी त्यांची कोणाविरोधात तक्रार नसल्याचे म्हटले आहे. या प्रकरणात संजय राठोड यांना निर्दोषत्त्व बहाल केल्याचे काही माध्यमांमधून आलेले वृत्त निराधार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Pooja Chavanपूजा चव्हाणBeedबीडShiv SenaशिवसेनाSanjay Rathodसंजय राठोडPoliceपोलिस