शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
2
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
3
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
4
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
5
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
6
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
7
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
8
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
9
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
10
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
13
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
14
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
15
वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
16
‘लोक माझ्यावर जळतात, माझ्याविरोधात…’, पराभवानंतर अजिंक्य रहाणे संतापला, टीकाकारांवर बरसला
17
Peace Of Mind: नातं की ओझं? भगवान बुद्धांच्या 'या' एका सूत्राने दूर होईल तुमच्या मनातील सर्व गोंधळ!
18
Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?
19
गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते…
20
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
Daily Top 2Weekly Top 5

Pooja Chavan Death Case: "उद्धवजी, संजय राठोडांची हकालपट्टी करा; ही घाण महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात नको"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2021 12:53 IST

Pooja Chavan Death Case: संजय राठोड यांच्या बचावासाठी तिन्ही पक्ष एकत्र काम करत असल्याचा भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा आरोप

पुणे: पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात (Pooja Chavan Death Case) भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेना नेते संजय राठोड (Sanjay Rathod), पुणे पोलीस आणि राज्य सरकारवर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. राठोड यांच्या बचावासाठी तिन्ही पक्ष एकत्र आले आहेत. संपूर्ण पोलीस यंत्रणा दावणीला बांधली गेली आहे. बलात्कारांना वाचवणाऱ्यांचं काम सरकारकडून सुरू आहे, असे आरोप वाघ यांनी केले आहेत. त्या पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होत्या.संजय राठोड-उद्धव ठाकरेंच्या भेटीवर भाजप नेत्याचा टोला, म्हणाले, "बहुदा त्यांना कानात सांगितलं असावं मी तुला..."चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण राहत असलेल्या वानवडीतील घराची पाहणी केली. त्यानंतर त्या वानवडी पोलीस ठाण्यात पोहोचल्या. यावेळी पोलिसांनी उद्धट उत्तर दिल्याचं वाघ यांनी सांगितलं. 'अतिशय गंभीर आरोप असलेल्या मंत्र्याला वाचवण्यासाठी तिन्ही पक्ष आणि पोलीस एकत्र काम करत आहेत. पोलिसांवर खूप मोठा दबाव आहे. त्यामुळेच पूजा चव्हाण प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून व्यवस्थित केला जात नाही,' असा आरोप त्यांनी केला. या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांनी काढून घेण्यात यावा आणि त्याची जबाबदारी सक्षम आयपीएस अधिकाऱ्याकडे देण्यात यावी, अशी मागणी वाघ यांनी केला."जो कोणी चुकला असेल त्याला मुख्यमंत्री क्षमा करणार नाहीत" शिवशाही केवळ भाषणात नको, कामातून दाखवा, असं आवाहन वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) केलं. 'बाकी कोणाकडून आम्हाला कोणतीही अपेक्षा नाही. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून आम्हाला अपेक्षा आहेत. कारण ते संवेदनशीलपणे आहेत. त्यामुळे त्यांनी संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा. अशी घाण महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात नको,' असं आवाहन त्यांनी मुख्यमंत्र्यांना केलं. राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीदेखील त्यांनी केली. संजय राठोड स्वत:ला वाचवण्यासाठी समाजाचा वापर करत असल्याचा आरोप वाघ यांनी केला. 'एका मंत्र्यावर गंभीर आरोप होतात. तो स्वत:च्या बचावासाठी समाजाला पुढे करतो. समाजाचा वापर करून घेतो. मुख्यमंत्री कोरोना पसरू नये असं आवाहन करत असताना हजारोंची गर्दी जमवतो. पण काहीच कारवाई होत नाही,' याबद्दल वाघ यांनी संताप व्यक्त केला. पोहरादेवीत राठोड यांच्या समर्थकांनी गर्दी केली. तिथल्या महंत कबिरदास यांच्या घरातील ५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अनेकांना कोरोनाची बाधा झाल्याची शक्यता आहे. यासाठी जबाबदार कोण, असा सवाल वाघ यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Pooja Chavanपूजा चव्हाणUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rathodसंजय राठोडChitra Waghचित्रा वाघ