शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
2
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
3
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
4
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
5
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
6
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
7
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
8
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
9
वैभव सूर्यवंशीला बाद केल्यावर केलं असं सेलिब्रेशन, अडचणीत सापडला जेमिसन, BCCIने सुनावली अशी शिक्षा  
10
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
11
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
12
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
13
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
14
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
15
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
16
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
17
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
18
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
19
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
20
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील पंचरंगी लढतीने राजकीय समीकरणे बदलली

By admin | Updated: September 26, 2014 23:29 IST

संभाजी पवार शिवसेनेसोबत : राष्ट्रवादीच्या हालचाली गतिमान; दिग्गज उमेदवारांमुळे लक्षवेधी लढत

अशोक डोंबाळे - सांगली --महायुती आणि आघाडीचा घटस्फोट झाल्यामुळे सांगली विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. दुरंगी, तिरंगी लढतीचे चित्र पंचरंगी लढतीपर्यंत पोहोचले आहे. काँग्रेस, भाजप, शिवसेना, मनसेचे उमेदवार निश्चित झाले असून राष्ट्रवादीची उमेदवारी अद्याप घोषित नाही. पंचरंगी लढतीत कोण कोणाची मते घेणार आणि कोण कोणाबरोबर राहणार, याचे गणित जमविण्यात उमेदवारांची कसोटी लागणार आहे.मागील विधानसभा निवडणुकीतील चुकलेल्या गणितामुळे यंदा काँग्रेसची उमेदवारी जाहीर होताच मदन पाटील यांनी राष्ट्रवादीवर टीका करून त्यांचा पाठिंबा गृहित धरत नसल्याचे सांगून फारकत घेतली होती. ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, दिनकर पाटील यांच्यावर आरोप करून त्यांनी, आघाडी फुटण्यापूर्वीच राष्ट्रवादीला लक्ष्य केले होते. गुरुवारी आघाडी संपुष्टात येताच राष्ट्रवादीतील हालचाली गतिमान झाल्या. दिनकर पाटील, सुरेश पाटील, श्रीनिवास पाटील यापैकी एकाच्या नावावर उद्या (शनिवारी) सकाळपर्यंत शिक्कामोर्तब होईल. मात्र सांगली शहरातील पदाधिकाऱ्यांच्या दोन गटातील धुसफूस टोकाला गेली आहे. एका गटाला उमेदवारी दिल्यास दुसरा गट दुखावला जाणार असून, त्यांची समजूत काढणे जयंत पाटील यांच्यासमोर मोठे आव्हान आहे.भाजपकडून विद्यमान आमदार संभाजी पवार, त्यांचे पुत्र पृथ्वीराज पवार, सुधीर गाडगीळ, नीता केळकर, धनपाल खोत, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी डोंगरे यांनी उमेदवारीची मागणी केली होती. पवार प्रबळ दावेदार असले तरी खा. संजय पाटील यांनी तक्रारी केल्याने संभाजी पवारांचा पत्ता कट करण्यात आला आणि गाडगीळ यांना उमेदवारी देण्यात आली. संजय पाटील यांनी शिवाजी डोंगरे यांच्या नावाचीही शिफारस केली होती. परंतु, डोंगरेंचा पत्ता कट झाल्यामुळे तेही नाराज आहेत. भाजप उमेदवाराच्या विरोधात बंड पुकारून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय डोंगरे यांनी घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे भाजपच्या नेत्यांमध्ये उलट-सुलट चर्चा आहे. पवारांनी पृथ्वीराज यांच्यासाठी शिवसेनेची उमेदवारी घेतली आहे. पवार शिवसेनेबरोबर गेल्यामुळे धनुष्यबाणाची शक्ती वाढली आहे. पवार भाजपमधून बाहेर पडल्यामुळे या निवडणुकीत भाजपसह सुधीर गाडगीळ यांचीही कसोटी लागणार आहे. शिवसेनेकडून सांगलीतून बजरंग पाटील यांचेही नाव पुढे आले होते. मात्र अखेर सेनेला उमेदवार आयात करावा लागला आहे. मनसेकडून अ‍ॅड. स्वाती शिंदे यांची उमेदवारी निश्चित झाली आहे.पंचरंगी लढतीमधील उमेदवारकाँग्रेस- मदन पाटीलभाजप- सुधीर गाडगीळराष्ट्रवादी- दिनकर पाटील, सुरेश पाटील, श्रीनिवास पाटील यापैकी एकशिवसेना- पृथ्वीराज पवारमनसे- अ‍ॅड्. स्वाती शिंदेडावी आघाडी रिंगणातून बाहेरसांगली मतदारसंघात कष्टकरी, हमाल, मजुरांची संख्या मोठी आहे. या मतदारांचा कौल नेहमीच डाव्या आघाडीच्या बाजूने राहिला आहे. परंतु, यंदा प्रथमच डाव्या आघाडीचा उमेदवार उभा राहणार नसल्याचे, जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार शरद पाटील, शेकापचे नेते अ‍ॅड्. अजित सूर्यवंशी यांनी जाहीर केले. तुल्यबळ उमेदवार मिळत नसल्याने हा निर्णय घेतल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.