मीरा रोडमध्ये पोलिओचा रुग्ण?

By Admin | Updated: June 21, 2014 01:38 IST2014-06-21T01:38:19+5:302014-06-21T01:38:19+5:30

एका पाच वर्षीय मुलीला पोलिओ झाल्याची शक्यता डॉक्टरांना वाटत असल्यामुळे तिच्या काही चाचण्या मुंबईच्या हाफिकन इन्स्टिटय़ूटमध्ये केल्या जात आहेत.

Polio case in Mira Road? | मीरा रोडमध्ये पोलिओचा रुग्ण?

मीरा रोडमध्ये पोलिओचा रुग्ण?

>अनिल खेडेकर- मीरा रोड
देशातून पोलिओचे उच्चाटन झाले असतानाच मीरारोड येथील काशी गावातील एका पाच वर्षीय मुलीला पोलिओ झाल्याची शक्यता डॉक्टरांना वाटत असल्यामुळे तिच्या काही चाचण्या मुंबईच्या हाफिकन इन्स्टिटय़ूटमध्ये केल्या जात आहेत.
वर्षातून चारवेळा महापालिकेचा आरोग्य विभागातर्फे पोलिओ डोस पाजण्यासाठी ठिकठिकाणी केंद्र उघडली जातात. घरोघरी कर्मचा:यांना पाठवून पाच वर्षाखालील मुलांना मोफत डोस पाजले जातात. महापालिका त्यासाठी वर्षाला लाखो रु पये खर्च करत असते. 
तरीही  मीरा रोड येथील काशी गावातील एका पाचवर्षीय मुलीला सतत ताप येत होता तिच्या पायांना कमालीचा अशक्तपणा आला आहे, डॉक्टराना पोलिओचा संशय आला असून तिचे ‘स्टूल’ (विष्ठा) तपासणीसाठी मुंबईच्या हाफकिन इन्स्टिटय़ूटमध्ये पाठविण्यात आले आहे. त्यावर रासायनिक प्रक्रि या केली जाते, त्या जंतूची वाढ होत आहे का? होत असल्यास त्याचा वेग काय आहे हे तपासले जाते. त्याला वैद्यकीय भाषेत (कल्चर) संबोधिले जाते. त्याचा प्राथमिक रिपोर्ट 1क् दिवसांनी, तर अंतिम रिपोर्ट 45 दिवसांनी येण्याची शक्यता आहे. यात रुग्ण पोलिओचा असल्याचे निष्पन्न झाल्यास दिल्लीवरून आरोग्य विभागाची टीम येण्याची शक्यता आहे.  दरम्यान, मीरा-भाईंदर महापालिकेने खबरदारीची मोहीम हाती घेतली असून या परिसरातील तीन क्षेत्रत पोलिओचे डोस मुलाना देण्यास सुरुवात केली आहे. या परिसरातील साधारण 5क्क् मुलांना डोस पाजले गेले आहेत.

Web Title: Polio case in Mira Road?