शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

भंगार विक्रेत्यांवर पोलिसांचा वॉच

By admin | Updated: August 2, 2014 03:06 IST

शीळ-डायघर या परिसरात भंगार विक्रेत्यांचे साम्राज्य दिवसेंदिवस वाढत असून, तेथील कामगार हे प्रशिक्षित नसल्याने बॉयलर स्फोट आणि वेल्डिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या गॅस सिलिंडर स्फोट

पंकज रोडेकर, ठाणेशीळ-डायघर या परिसरात भंगार विक्रेत्यांचे साम्राज्य दिवसेंदिवस वाढत असून, तेथील कामगार हे प्रशिक्षित नसल्याने बॉयलर स्फोट आणि वेल्डिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या गॅस सिलिंडर स्फोट यांसारख्या घटना घडत आहेत. अशा घटना भविष्यात घडू नयेत, तसेच कामगारांनी ते कशा प्रकारे हाताळाव्यात यासाठी ठाणे शहर पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत केमिकल आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत त्या कामगारांमध्ये जनजागृती करून भंगार विक्रेत्यांची नोंदणी करून त्यांच्यावर विशेष वॉच ठेवला जाणार आहे.मुंब्य्रातील शीळ-डायघर हा परिसर ठाणे आणि नवी मुंबई तसेच कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सीमेवर वसलेला असून, तेथील लोकसंख्याही सुमारे अडीच लाखांच्या घरात पोहोचलेली आहे. त्यातच या परिसरात दिवसेंदिवस भंगार विक्रेत्यांची संख्या वाढत असून, त्यांचीही ना महापालिका ना सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडे कोणत्याही प्रकारची नोंद आहे. येथील विक्रेत्यांकडे आजूबाजूच्या परिसरातील केमिकल कंपनीतून भंगारात काढलेले कंटेनर आणून त्यांची विल्हेवाट लावली जाते. मात्र, त्याचे विल्हेवाट लावणाऱ्या त्या कामगारांना हे कसे हाताळावेत याबाबत कोणतेही ज्ञान नसल्यानेच मागील काही महिन्यांमध्ये केमिकल बॉयलर आणि वेल्डींग गॅस सिलिंडर स्फोटासारख्या घटना घडत आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाणे शहर पोलिसांनी कामगार आणि तेथील जनेतच्या सुरक्षितेसाठी ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत पोलिसांनी शीळ डायघर परिसरातील भंगार विक्रेत्यांचा सर्व्हे करून त्यांची नोंद करण्यास सुरुवात केली आहे. तसेच त्या कामगारांना त्याचे योग्य प्रशिक्षण देण्याबाबत काही केमिकल कंपनीच्या व्यवस्थापन विभागांशी संपर्क साधल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.