पोलीस पाटलाने केले अत्याचार

By Admin | Updated: October 24, 2015 03:57 IST2015-10-24T03:57:16+5:302015-10-24T03:57:16+5:30

रत्नागिरीच्या एका खेड्यातील १५ वर्षीय मुलीवर गावच्या पोलीस पाटलासह तिघांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उघडकीस आली.

Police torture done by Patala | पोलीस पाटलाने केले अत्याचार

पोलीस पाटलाने केले अत्याचार

मुंबई : रत्नागिरीच्या एका खेड्यातील १५ वर्षीय मुलीवर गावच्या पोलीस पाटलासह तिघांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उघडकीस आली. केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्यानंतर, याप्रकरणी पोलीस पाटलासह तिघांविरुद्ध बलात्कार, पॉस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मूळची रत्नागिरी येथील राजापूरमध्ये राहणारी तक्रारदार १५ वर्षीय मुलगी आई वडिलांसोबत राहते. त्याच गावातील पोलीस पाटीलांसह तिच्या काका आणि अन्य एक साथीदाराने तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. मुलीच्या पोटात दुखत असल्याने कुटुंबियांनी तिच्याकडे विचारणा केली असता, तिने झालेला घटनाक्रम सांगितला. मात्र बदनामीच्या भीतीने तिच्या कुटुंबियांनी तक्रार न करताच मुंबईतील नातेवाईकांकडे धाव घेतली. नातेवाईकांच्या मदतीने तिला केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले. रुग्णालय प्रशासनाकडून भोईवाडा पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर मुलीच्या तक्रारीनुसार, गावच्या पाटलासह तिचा काका आणि अन्य एका साथीदाराविरुद्ध भोईवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपासासाठी हा गुन्हा
राजापुर पोलिसांकडे वर्ग केला
आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Police torture done by Patala