शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

पोलिसांनी कर्तव्य बजावताना राष्ट्रहित जोपासावे : पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2019 9:05 PM

देशातील स्त्रियांना सुरक्षिता आणि सुरक्षित वाटेल, अशा प्रभावी पोलिसिंगच्या भूमिकेवर सर्वाधिक भर दिला पाहिजे... 

ठळक मुद्दे राष्ट्रीय पोलिस महासंचालक परिषदेची सांगतादेशात अखिल भारतीय पोलिस विद्यापीठाचा मानस राज्य पोलिस दलाने विविध प्रकाराच्या कामाच्या संदर्भात केले सादरीकरण

पुणे : पोलिस म्हणून कर्तव्य बजावताना त्यांच्यावर अनेक ताण, तणावांना सामारे जावे लागते़ त्यातूनच मार्ग काढत गरीबांचे कल्याण लक्षात ठेवून पोलिसांनी कर्तव्य बजावताना राष्ट्रहितासाठी काम करणे सुरु ठेवावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले़ राष्ट्रीय पोलीस महासंचालक परिषदेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते़ राष्ट्रीय स्तरावरील पोलिस महासंचालकांच्या ५४ व्या तीन दिवसीय परिषदेची सांगता रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाने झाली. यावेळी गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय गृह राज्यमंत्री जी़ किशन रेड्डी, नित्यानंद राय यांच्यासह पोलिस व गुप्तचर विभागाचे अतिवरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  पंतप्रधांनाच्या मार्गदर्शनासह मत आणि अनुभवाचे देवाणघेवाण करण्यासाठी या परिषदेत पूर्वी एक दिवस असायचा, मात्र २०१५ पासून परिषदेच्या कार्यक्रमामध्ये बदल करण्यात आला असून तीन दिवस ही परिषद घेण्यात येते.या परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शुक्रवारी रात्री पुण्यात आगमन झाले़ शनिवार आणि रविवारी असे दोन्ही दिवस त्यांनी या परिषदेला उपस्थित राहून सर्व प्रमुख वक्तांनी मांडलेली मते लक्षपूर्वक ऐकली़  शनिवारी दुसºया सत्रात पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून देशातील अंतर्गत सुरक्षा यांच्यासह दहशतवाद, नक्षलवाद, किनारपट्टी सुरक्षा, सायबर सुरक्षा, कट्टरता वाद आणि अमंली पदार्थ तस्करी या सारख्या अंतर्गत व बाह्य सुरक्षेच्या बाबतीत जागरूक राहण्याबाबत चर्चा केली. यावेळी मोदींच्या हस्ते गुप्तचर यंत्रणामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना विशिष्ठ सेवेसाठी राष्ट्रपतींच्या पोलिस पदकाने त्यांना गौरविण्यात आले. पंतप्रधानांनी देशातील शांतता राखण्यासाठी देशाच्या पोलिस दलाने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करुन मोदी यांनी सांगितले की, पोलिसांच्या पाठीशी त्यांचे कुटुंबीय ठामपणे उभे राहतात़. पोलिसांच्या कुटुंबियांनी दिलेल्या या योगदानाला विसरुन चालणार नाही. महिला व बालकांसह समाजातील सर्व घटकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी तसेच पोलिस दलाची प्रतिमा सुधारण्यासाठी  नेहमी प्रयत्न केले पाहिजे. एकंदर देशातील स्त्रियांना सुरक्षिता आणि सुरक्षित वाटेल, अशा प्रभावी पोलिसिंगच्या भूमिकेवर सर्वाधिक भर दिला पाहिजे. यावेळी राज्य पोलिस दलाने विविध प्रकाराच्या कामाच्या संदर्भात सादरीकरण केले. ते पाहून त्यांनी अशा चांगल्या कामांची एक विस्तृत यादी करता येईल, अशी सूचना केली़. राष्ट्रीय पोलीस परिषदेच्या समारोपानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वायूदलाच्या खास विमानाने दिल्लीला रवाना झाले़. ़़़़़़़देशात अखिल भारतीय पोलिस विद्यापीठाचा मानस पोलिस महासंचालकांच्या परिषदेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी  वैचारिक कुंभ असे संबोधले आहे़.  ज्या देशातील अतिवरिष्ठ पोलिस अधिकारी एका व्यासपीठावर एकत्र येतात आणि राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात धोरणात्मक निर्णय घेतात. त्यांनी केलेल्या चांगल्या कामाबद्दल देशभरातील पोलिस दलाचे कौतुक केले. लवकरच देशातील काही राज्यात अखिल भारतीय पोलिस विद्यापीठ आणि अखिल भारतीय फॉरेन्सिक सायन्स विद्यापीठ यांची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या परिषदेत केली़. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसNarendra Modiनरेंद्र मोदी