शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
4
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
5
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
6
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
7
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
8
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
9
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
10
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
11
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
12
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
13
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
14
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
15
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
16
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
17
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
18
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
19
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
20
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

पारधी तांड्यांवर पोलिसांचे छापे

By admin | Updated: March 24, 2015 00:38 IST

पानसरे हत्या प्रकरण : मिरज, कर्नाटकात गुन्हेगारांची धरपकड; चौघे ताब्यात, कसून चौकशी

सांगली/कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी मिरजेतील एका दाम्पत्याने दिलेल्या माहितीच्या आधारे कोल्हापूर पोलिसांनी रविवारी रात्रीपासून मिरज व कर्नाटकातील पारधी तांड्यांवर छापे टाकून संशयित गुन्हेगारांची धरपकड सुरू केली आहे. या कारवाईत सांगली पोलिसांना न घेता कोल्हापूर पोलिसांची स्वतंत्रपणे कारवाई सुरू आहे. गेल्या दोन दिवसांत चार गुन्हेगारांना ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. मात्र, तपासात मदत होईल, अशी कोणतीही माहिती हाती लागलेली नाही. यामुळे धरपकड आणि चौकशीसत्र सुरूच आहे.फासेपारधी गुन्हेगाराने २५ लाखांची ‘सुपारी’ घेऊन पानसरे यांची हत्या केल्याची माहिती एका दाम्पत्याने दिली असली तरी, पोलिसांचा त्यावर पूर्ण विश्वास नाही. या तपासाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असल्याने, जी माहिती मिळेल, तो धागा पकडून पोलीस पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पोलिसांनी या दाम्पत्याची विशेष काळजी घेऊन, ज्या फासेपारधी गुन्हेगाराने ‘सुपारी’ घेऊन पानसरे यांची हत्या केली, त्याबद्दल बारकाईने माहिती घेणे सुरू ठेवले आहे. या दाम्पत्याने या गुन्हेगाराचेनावही पोलिसांना दिले आहे. त्याचे मिरज व कर्नाटकात वास्तव्य असल्याने रविवारी रात्री कोल्हापूर पोलिसांची चार पथके मिरजेत दाखल झाली होती. त्यांच्यासोबत हे दाम्पत्यही होते. पथकाने मिरज तसेच तालुक्यातील पारधी तांड्यांवर छापे टाकले. कर्नाटकातही काही पथके रवाना झाली होती. तेथील पोलिसांच्या मदतीने छापे टाकून गुन्हेगारांचा शोध घेतला. चार संशयित हाती लागले; पण दाम्पत्याने नाव सांगितलेला गुन्हेगार मिळालेला नाही.सांगली पोलीस दलातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, कोल्हापूर पोलिसांनी मिरज व कर्नाटकात छापे टाकले आहेत. त्यांच्या पातळीवर ते गुन्हेगारांची धरपकड करीत आहेत. यामध्ये आम्हाला कोठेही सहभागी करून घेतलेले नाही. आतापर्यंत त्यांना आम्ही तपासात मदत केली आहे. रिव्हॉल्व्हर तस्करी व रिव्हॉल्व्हर बाळगणाऱ्या १८० गुन्हेगारांची चौकशी केली आहे. घटनेदिवशी व घटनेपूर्वी त्यांचे वास्तव्य कोठे होते, याची सर्व माहिती रेकॉर्डवर घेतली आहे. रेकॉर्डवरील सातशेहून अधिक दुचाकी चोरट्यांची चौकशी झाली आहे. वाळवा तालुक्यातील चार तरुणांची नावे पुढे आली होती, त्यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. जोपर्यंत ठोस माहिती हाती लागत नाही, तोपर्यंत चौकशी व छापासत्र सुरूच राहील. (प्रतिनिधी)नेतेही चौकशीच्या जाळ्यात!सांगली जिल्ह्यात फासेपारधी समाज व गुन्हेगारांना एकत्रित करुन त्यांना शासनाच्या सोयी-सुविधा मिळवून देणारे काही नेते कोल्हापूर पोलिसांच्या चौकशीच्या जाळ्यात अडकले आहेत. या नेत्यांना प्रत्येक पारधी कुटुंबातील गुन्हेगार परिचयाचा आहे. यामुळे या नेत्यांकडून काही माहिती मिळते का, यासाठीही प्रयत्न सुरु आहेत. या समाजातील गुन्हेगार पाच-दहा हजाराची चोरी करण्यात धन्यता मानतात. ‘सुपारी’ घेऊन पानसरे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याची ते हत्या करण्याचे धाडस करणार नाहीत, असा पोलिसांचा कयास आहे, परंतु मिळालेल्या कोणत्याही माहितीकडे दुर्लक्ष करायचे नाही, असा विचार करुन पोलिसांनी दाम्पत्याने दिलेल्या माहितीच्या आधारे तपासाला गती दिली आहे.तीन वेळा संधी हुकलीपानसरे यांच्या हत्येचा तपास करीत असताना आतापर्यंत तीन वेळा महत्त्वपूर्ण धागेदोरे हाती लागले होते, परंतु सर्व स्तरावर तपास करीत असताना अखेरच्या टप्प्यामध्ये संधी हुकली. गेले महिनाभर मेहनत करून चौथ्यांदा हाती लागलेल्या फासेफारधी गुन्हेगाराची टीप कोल्हापूर पोलिसांसाठी महत्त्वाची बनली आहे. त्याच्या मुसक्या आवळल्यानंतर या घटनेमागचे सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. त्यासाठी पोलीस कसोशीने प्रयत्न करीत आहेत. माहिती देण्यास शर्मा यांचा नकारसोमवारी सायंकाळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांची भेट घेतली. यावेळी त्यांना या प्रकरणात काही तथ्य आहे का? अशी विचारणा केली. त्यावर शर्मा यांनी पानसरे यांच्या हत्येचा तपास अत्यंत गोपनीय आहे, या तपासाबाबत वरिष्ठ पातळीवरून कोणतीही माहिती देण्यास निर्बंध असल्याचे सांगून माहिती देण्यास नकार दिला.‘लोकमत’च्या वृत्ताने खळबळपानसरे यांची हत्या २५ लाखांची सुपारी घेऊन करण्यात आल्याचे वृत्त सोमवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच सर्वत्र खळबळ उडाली. कोल्हापुरात पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी रात्री आठच्या सुमारास काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेतली. ही बैठक सुमारे दोन तास सुरू होती. बैठकीस अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल, गडहिंग्लज विभागाचे सुरेश मेंगडे, इचलकरंजी विभागाचे एम. एम. मकानदार, आदी उपस्थित होते.