शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

झाडे तोडणाऱ्यांवर पोलीस कारवाई करा - सयाजी शिंदे मित्रपरिवाराचे आंदोलन

By admin | Updated: January 18, 2017 09:43 IST

गेले आठ महिने जपलेल्या वृक्षांची कत्तल होऊन २४ तास उलटल्यानंतरही पोलिसांनी पंचनामा केला नसून आरोपीच्या ताबडतोब मुसक्या आवळाव्यात अशी मागणी अभिनेता सयाजी शिंदे यांच्यातर्फे करण्यात आली.

ऑनलाइ लोकमत
मुंबई, दि. १८ -  लहान मुलांप्रमाणे काळजी घेत गेली आठ महिने जपलेल्या वृक्षांची कत्तल होऊन २४ तास उलटले, पण पोलिसांनी साधा पंचनामा करण्याचेही सौजन्य दाखविले नाही. एवढेच नव्हे तर थातूरमातूर कारवाईचा देखावा निर्माण करून केवळ अदखलपात्र गुन्हा (एन.सी) दाखल केला आहे. पोलिसांनी एफआयआर दाखल करून आरोपींच्या मुसक्या ताबडतोब आवळाव्यात, या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदान येथे धरणे आंदोलन आयोजित करण्याचा निर्णय 'चार गाव जलयुक्त शिवार अभियानातील' (पांढरवाडी, कोळेवाडी, गोडसेवाडी व दिवडी, ता. माण, जि. सातारा) ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी घेतला आहे. या आंदोलनात सयाजी शिंदे मित्र परिवाराचे सदस्यही सहभागी होतील.
 
राज्यातील वृक्षप्रेमी, जलसंधारण चळवळीतील कार्यक्रते यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. वृक्षतोडीच्या निषेधार्थ चार गावच्या मुंबईतील ग्रामस्थांनी काल रात्री (मंगळवारी) तातडीची बैठक आयोजित केली होती. वृक्षतोडीच्या प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतानाच पोलिसांची कार्यवाही अतिशय चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली. हे घृणास्पद कृत्य करणारया गुन्हेगाराला तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन आयोजित करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
 
अभिनेते सयाजी शिंदे यांच्या पुढाकाराने चार गावांत १५ हजार पेक्षा जास्त झाडे लावण्यात आली आहेत. पांढरवाडी येथे साधारण ६ फुट उंचीची १०० झाडे जून २०१६ मध्ये रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आली होती. यात वड, पिंपळ, उंबर, महागुणी, बदाम, कडूलिंब, साग इत्यादी वृक्षांचा समावेश होता. ग्रामस्थ व शाळकरी मुलांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे गेली आठ महिने या झाडांची देखभाल केली. स्वत: सयाजी शिंदे आणि त्यांच्या मित्रपरिवाराचे या झाडांवर लक्ष होते. झाडांना वेळेवर पाणी घालणे, तण काढणे, आळी करणे अशी देखभाल नियमितपणे केली जात होती. कोवळी शाळकरी मुले तर डोक्यावर हंडा घेऊन झाडांना पाणी घालत असायची. 
 
सर्वांच्या मेहनतीने ही झाडे चांगली बहरली होती. गावात प्रवेश करतानाच ही झाडे येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घ्यायची. पण काही विकृत मनोवृत्तीच्या नतद्रष्टाने यांतील ५० झाडे मध्यरात्री तोडून टाकली. अक्षरश: कुऱ्हाडीने घाव घातलेली झाडे उन्मळून पडलेल्या अवस्थेत पाहताना गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर राज्यभरातील वृक्षप्रेमींमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
 
पण दहिवडी पोलीस ठाण्याला हा प्रकार गंभीर वाटत नाही. आतापर्यंत आरोपींच्या मुसक्या आवळून त्यांना तुरूंगाची हवा दाखवायला हवी होती. ज्या हातांनी झाडे तोडली त्या हातात बेड्या पडायला हव्या होत्या. पण पोलिसांनी अतिशय नेभळट भूमिका घेऊन आपल्या असंवेदनशीलतेचे दर्शन घडविले आहे.
ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी अद्याप पंचनामा सुद्धा केला नाही. साधा मोबाईल चोरिला गेला तरी एफआयआर दाखल होतो, मात्र अत्यंत नियोजनबद्धपणे झाडांची कत्तल करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी साधी एन.सी. दाखल केली आहे.
 
मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी
जलयुक्त शिवार अभियानाच्या चळवळीअंतर्गत ही झाडे लावली होती. या चार गावांतील लोकांनी अभुतपूर्व अशी एकजूट करून महाराष्ट्रात आदर्शवत ठरतील अशी कामे केली आहेत. पण अशा सामाजिक कार्यात अडथळे आणणाऱ्या समाजकंटकांवर पोलीस काहीच कारवाई करणार नसतील तर चांगल्या भावनेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे मनोबल खचले जाईल. चार गाव जलयुक्त शिवार अभियानातील कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, असे आवाहन केले आहे.