शहरं
Join us  
Trending Stories
1
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
2
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
3
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
4
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
5
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
6
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
7
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
8
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
9
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
10
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
11
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
12
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
13
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
14
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
15
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
16
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
17
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
18
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
19
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
20
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांचा दौरा पाच तासांचा?

By admin | Updated: August 15, 2014 00:39 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २१ तारखेच्या नागपूर जिल्हा दौऱ्याचा अधिकृत कार्यक्रम प्रशासनाकडे आला नसला तरी, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोदी यांचा नागपूर जिल्हा दौरा पाच तासांचा

राज्यपाल, मुख्यमंत्री येणारनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २१ तारखेच्या नागपूर जिल्हा दौऱ्याचा अधिकृत कार्यक्रम प्रशासनाकडे आला नसला तरी, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोदी यांचा नागपूर जिल्हा दौरा पाच तासांचा राहण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोदी यांचे दुपारी २ वाजता नागपूर विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर ते राजभवनावर जातील. तेथून ते हेलिकॉप्टरने मौदा येथे नॅशनल थर्मल पॉवर स्टेशनतर्फे (एनटीपीसी) आयोजित कार्यक्रमासाठी जातील. तेथे ३ वाजता कार्यक्रम आहे. तेथून ते नागपूरला येतील. सायं. ५ वाजता कस्तूरचंद पार्कवर आयोजित मेट्रो रेल्वेसह विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमास ते उपस्थित राहतील. एनटीपीसी आणि नागपूरमधील कार्यक्रमास राज्यपाल के. शंकरनारायणन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल, केंद्रीय शहर विकास मंत्री वेंकय्या नायडू आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अन्य मंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मोदी त्यांच्या व्यस्त दौऱ्यात दीक्षाभूमी आणि स्मृतिमंदिरालाही भेट देण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमात शेवटच्या क्षणापर्यंत बदल होण्याची शक्यता असल्याने, दौऱ्याचा अधिकृत कार्यक्रम आल्यावरच त्यावर शिक्कामोर्तब होईल. दरम्यान, एनटीपीसीने मौदा येथील कार्यक्रमाची तयारी सुरू केली आहे. गुरुवारी विभागीय आयुक्त कार्यालयात एनटीपीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची विभागीय आयुक्तांसोबत बैठक झाली. येत्या दोन-तीन दिवसांत पंतप्रधानांच्या दौऱ्याचा अधिकृत कार्यक्रम प्रशासनाकडे येण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)