विमान अपघातात अजित पवारांचे निधन; PM मोदी, अमित शाह यांचा CM देवेंद्र फडणवीसांना फोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 10:45 IST2026-01-28T10:43:54+5:302026-01-28T10:45:28+5:30

Deputy CM Ajit Pawar Passed Away: या बातमीमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.

pm narendra modi and amit shah contact cm devendra fadnavis and receives information and updates about the baramati plane crash | विमान अपघातात अजित पवारांचे निधन; PM मोदी, अमित शाह यांचा CM देवेंद्र फडणवीसांना फोन

विमान अपघातात अजित पवारांचे निधन; PM मोदी, अमित शाह यांचा CM देवेंद्र फडणवीसांना फोन

Deputy CM Ajit Pawar Passed Away: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभा घेण्यासाठी अजित पवार मुंबईहून बारामती येथे जात होते. सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांनी बारामती विमानतळावर उतरताना अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर विमानाला मोठी आग लागली. यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला.

अजित पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी कळताच बारामतीत कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली. शरद पवार मुंबईतील निवासस्थानाहून बारामतीकडे निघालेत. सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार दिल्लीत होते. ही बातमी समजताच हे तिघे जण तत्काळ बारामती येथे जाण्यासाठी निघाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांना अश्रु अनावर झाले. काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी सर्व कार्यक्रम रद्द केले असून, बारामतीसाठी निघाले आहेत. 

PM मोदी, अमित शाह यांचा CM देवेंद्र फडणवीसांना फोन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या दोघांनीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून बारामती येथील विमान अपघाताबाबत माहिती घेतली. दुसरीकडे, प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार विमान धावपट्टीवर उतरत असतानाच ही दुर्घटना घडली. विमान कोसळताच त्याने पेट घेतल्याने ते संपूर्ण जळून खाक झाले. 

दरम्यान, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानेदिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, बारामती येथे झालेल्या विमानाचा अपघात अत्यंत भीषण होता. या विमानात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह एकूण ५ व्यक्ती होत्या. अजित पवार यांच्यासोबत त्यांचे एक पी.एस.ओ. आणि एक सहाय्यक प्रवास करत होते. विमानाचे नियंत्रण करण्यासाठी दोन क्रू मेंबर्स, ज्यात मुख्य पायलट आणि सह-पायलट  यांचा समावेश होता. डीजीसीएने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या भीषण क्रॅश लँडिंगमध्ये विमानातील कोणीही वाचू शकलेले नाही. विमानातील पाचही जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title : विमान दुर्घटना में अजित पवार का निधन; पीएम मोदी ने सीएम को फोन किया

Web Summary : बारामती हवाई अड्डे के पास एक विमान दुर्घटना में उपमुख्यमंत्री अजित पवार का दुखद निधन हो गया। लैंडिंग के दौरान दुर्घटना हुई, जिसमें सवार सभी छह लोगों की मौत हो गई। पीएम मोदी और अमित शाह ने सीएम फडणवीस से जानकारी ली। जांच जारी है।

Web Title : Ajit Pawar Dies in Plane Crash; PM Modi Calls CM

Web Summary : Deputy CM Ajit Pawar tragically died in a plane crash near Baramati airport. The accident occurred during landing, killing all six on board. PM Modi and Amit Shah contacted CM Fadnavis for details. Investigation underway.