संमेलनाध्यक्ष निवडणुकीचे चित्र आज स्पष्ट होणार

By Admin | Updated: September 30, 2014 01:24 IST2014-09-30T01:24:18+5:302014-09-30T01:24:18+5:30

पंजाबच्या घुमान येथे होणा:या 88व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस आहे.

The picture of election campaign meeting will be clear today | संमेलनाध्यक्ष निवडणुकीचे चित्र आज स्पष्ट होणार

संमेलनाध्यक्ष निवडणुकीचे चित्र आज स्पष्ट होणार

>पुणो : पंजाबच्या घुमान येथे होणा:या 88व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस आहे. त्यानंतरच ही निवडणूक तिरंगी होणार की चौरंगी, हे स्पष्ट होईल.
निवडणुकीसाठी संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्यासह भारत सासणो, डॉ. अशोक कामत व पुरूषोत्तम नागपुरे यांनी अर्ज दाखल केले आहेत. आता मंगळवारी सायंकाळ पर्यत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. 

Web Title: The picture of election campaign meeting will be clear today