शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्मूल्यांकनात पात्र १,३८१ शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान

By admin | Updated: March 31, 2015 02:58 IST

कायम विनाअनुदानित यामधील ‘कायम’ शब्द वगळल्यानंतर पुनर्मूल्यांकनानंतर १,३८१ शाळा पात्र ठरल्या असून, त्यांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्यात येईल

मुंबई : कायम विनाअनुदानित यामधील ‘कायम’ शब्द वगळल्यानंतर पुनर्मूल्यांकनानंतर १,३८१ शाळा पात्र ठरल्या असून, त्यांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्यात येईल, अशी घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी विधान परिषदेत केली.रामनाथ मोते व विक्रम काळे यांनी याबाबत दोन स्वतंत्र लक्षवेधी सूचना दाखल केल्या होत्या. शिक्षणमंत्री तावडे म्हणाले, की २० जुलै २००९ रोजी ‘कायम’ हा शब्द वगळण्यात आला. त्यानंतर पहिल्या टप्प्यात पुनर्मूल्यांकन करून १,५५१ प्राथमिक शाळांपैकी ३८६ पात्र घोषित केल्या गेल्या. माध्यमिक १,८९१ शाळांपैकी ५८ शाळा पात्र घोषित केल्या गेल्या. दुसऱ्या टप्प्यात ३७१ प्राथमिक व १,०१० माध्यमिक शाळा पात्र ठरल्या. पुनर्मूल्यांकनात १५१ प्राथमिक व २८० माध्यमिक शाळा अपात्र ठरल्या. त्यानंतर पुनर्मूल्यांकन थांबवले गेले. दरम्यान, शालेय शिक्षण विभागाने मे २०१४ मध्ये उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील ९२६ पदांचा मान्यता दिली. मात्र वेतनाकरिता निधीची तरतूद पुरवणी मागण्यांमध्ये केली नाही, ही बाब मोते यांनी निदर्शनास आणली व शिक्षण खात्याच्या सचिवांना शिल्लक रकमेतून ही रक्कम देण्यास प्राधिकृत करण्याची मागणी केली. शिक्षणमंत्री तावडे यांनी ती मान्य केली. (विशेष प्रतिनिधी)