शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
5
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
6
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
7
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
8
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
9
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
10
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
11
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
12
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
13
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
14
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
15
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
16
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
17
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
18
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
19
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!
20
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!

"लोक म्हणाले, न्याय हवा असेल तर राज ठाकरेंना भेटा"; प्रिया फुके मुलासह 'शिवतीर्थ'वर पोहचल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 12:49 IST

परिणय फुके हे साम, दाम, दंड भेद वापरून आम्हाला त्रास देत आहेत. आम्हाला आमचा हक्क द्यावा हीच आमची मागणी आहे असं त्यांनी सांगितले. 

मुंबई - फुके यांच्या कौटुंबिक वादातून त्यांच्या सून प्रिया फुके न्याय मागण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी पोहचल्या. काही दिवसांपूर्वी प्रिया फुके यांनी विधानभवनाबाहेर आंदोलन केले त्यानंतर पोलिसांनी २ मुलांसह त्यांना ताब्यात घेतले. आज प्रिया फुके त्यांच्या मुलासह दादरच्या शिवतीर्थवर दाखल झाल्या. साम,दाम दंड भेद वापरून भाजपा आमदार परिणय फुके यांच्याकडून आम्हाला त्रास दिला जात आहे असा आरोप प्रिया फुके यांनी केला असून लोकांनी न्याय हवा असेल तर राज ठाकरेंना भेटा, ते तुम्हाला न्याय मिळवून देतील असं मला सांगितले. त्यामुळे मी इथं त्यांच्या भेटीसाठी आल्याचे प्रिया फुके यांनी म्हटलं.

प्रिया फुके म्हणाल्या की, मी राजसाहेबांची भेटायला वेळ घेतली नाही. परंतु मला मदत करणाऱ्या सगळ्यांनी तुम्ही राज ठाकरेंकडे जा, ते तुम्हाला न्याय मिळवून देतील असं सांगितले. फार आशेने आज मी इथे आली आहे. परिणय फुके यांचे ऐकले तर हे न्यायालयीन प्रकरण आहे असं ते सांगतात. तुम्ही लोकनेते असताना घरातल्या महिलेला न्याय देऊ शकत नाही. सहा महिन्यात एक निकाल येणार होता परंतु परिणय फुके यांनी सगळे मॅनेज करून त्याला एक दीड वर्ष लावला. दीड वर्षांनी जेव्हा निकाल हाती आला तेव्हा सगळे अकाऊंट रिकामे होते. सासू-सुनेचे भांडण असते तर घरातच वाद संपला असता, परिणय फुके हे साम, दाम, दंड भेद वापरून आम्हाला त्रास देत आहेत. आम्हाला आमचा हक्क द्यावा हीच आमची मागणी आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच हा प्रश्न पुरुषी इगोवर आला आहे अन्यथा हा वाद सुटू शकतो. मला मुलांना घेऊन विधानभवनाबाहेर आंदोलन करावे लागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी भेटीला वेळ मागितला परंतु ती मिळाली नाही. मी मोठ्या अपेक्षेने राज ठाकरे यांच्याकडे आली आहे. ते मला भेटतील आणि आमचे ऐकून न्याय मिळवून देतील. मुख्यमंत्री कुठल्याही पक्षाचे असतील परंतु माणुसकीसाठी एका स्त्रीला न्याय देण्यासाठी पुढे आले पाहिजे. आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा असं प्रिया फुके यांनी म्हटलं.

"...म्हणून राज ठाकरेंकडे आले"

दरम्यान, जेव्हा मी इन्स्टाग्रामवर लाईव्ह आले, व्हिडिओ काढले आहेत. त्यात प्रत्येकाने मला हेच सांगितले, तुम्ही राजसाहेबांना भेटा, ते तुम्हाला न्याय मिळवून देतील. मी सगळ्यांच्या दारात उभी राहिली आहे. भाजपाच्या छोट्यापासून मोठ्यापर्यंत सर्वांच्या दारी गेले परंतु मला न्याय मिळाला नाही. ही पक्षाची गोष्ट नाही. एका स्त्रीला कितपत तुम्ही मदत करू शकता ही गोष्ट आहे. मी विधानभवनाबाहेर गेले तिथे पोलिसांनी ताब्यात घेतले. मला ३-४ तास बसवून ठेवले. मी एक वर्षापासून मुख्यमंत्र्‍यांना वेळ मागतेय. नाण्याच्या दोन बाजू असतात. त्या त्यांनी ऐकायला हव्यात. केवळ एकच बाजू ऐकून ते तसे वागत आहेत. मुख्यमंत्र्‍यांनी पाठराखण करू नये. आम्हाला १ रुपयाही जास्त नको, आम्हाला आमचा हक्क हवाय. आम्ही हक्कासाठी लढतोय असं प्रिया फुके यांनी म्हटलं.

कोण आहेत प्रिया फुके?

प्रिया फुके या भाजपा आमदार परिणय फुके यांच्या भावाच्या पत्नी आहेत. त्यांच्या पतीचे २०२२ मध्ये निधन झाले. त्यानंतर संपत्तीच्या वादावरून फुके कुटुंबात वाद सुरू झाला. तू कोण आहेस असं म्हणत प्रिया फुके यांना रात्री घराबाहेर काढले. त्याशिवाय परिणय फुके यांनी सत्तेचा गैरवापर करत मला जीवे मारण्याच्याही धमक्या दिल्या असा गंभीर आरोप प्रिया फुके यांनी केला होता. अलीकडेच त्यांनी २ मुलांना घेऊन विधान भवनाबाहेर आंदोलन केले. मात्र पोलिसांनी त्यांच्या मुलांसह प्रिया फुके यांना ताब्यात घेतले होते. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेParinay Fukeपरिणय फुकेBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस