शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

लोकसभा निवडणुकीत ‘ पवार’ कनेक्शन - कुटुंबाशी संबंधित पाच जणांची उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 17:21 IST

एकाच कुटुंबातील तीन उमेदवार नको म्हणून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली. मात्र,

पुणे : एकाच कुटुंबातील तीन उमेदवार नको म्हणून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली. मात्र, तरीही पवार कुटुंबांशी संबंधित पाच जण लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यातील तीन जण राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून आहेत तर दोघे जण शिवसेना- भारतीय जनता पक्ष युतीकडून लढत आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्या दुसऱ्यांदा निवडणूक लढवित आहेत. त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळालेल्या कांचन कुल या पवार कुटुंबियांच्याच जवळच्या नात्यातील आहेत.  माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या त्यांच्या आत्या आहेत. कांचन यांचे वडील कुमारराजे निंबाळकर हे सुनेत्रा पवार यांचे चुलत बंधु आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उस्मानाबाद मतदारसंघातून पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणा जगजितसिंह निवडणूक लढवित आहेत. पद्मसिंह पाटील हे सुनेत्रा पवार यांचे सख्खे बंधू आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेनेकडून लढत असलेले ओमराजे निंबाळकर हे पदमसिंह पाटील यांचे चुलत बंधू पवनराजे निंबाळकर यांचे चिरंजीव आहेत. त्यामुळे त्यांचेही पवार कुटुंबियांशी नाते आहे. 

भारतीय जनता पक्षामध्येही नातेगोते भारतीय जनता पक्षामध्येही नात्यागोत्याचे राजकारण आहे. पुण्यातून लोकसभेसाठी इच्छुक असलेले भाजपाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांचे जावई रोहन देशमुख हे माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. ते सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे चिरंजीव आहेत. पुण्यातून माघार घेताना संजय काकडे यांनी रोहन यांच्यासाठी शब्द टाकल्याची चर्चा आहे.              

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणSharad Pawarशरद पवारLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा