डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 18:55 IST2025-09-25T18:54:36+5:302025-09-25T18:55:07+5:30

Maharashtra ST Bus News: अ‍ॅपबाबत १ लाखांहून अधिक प्रतिक्रिया

Passengers response is overwhelmingly to ST mobile app as Number of users crosses 1 million | डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार

डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार

Maharashtra ST Bus News: राज्य परिवहन महामंडळाच्या (ST) मोबाईल अ‍ॅपला अलीकडे प्रवाशांकडून वाढती पसंती मिळत असून सध्या या अ‍ॅपचे सुमारे १० लाख वापरकर्ते आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. एसटी महामंडळाने काही महिन्यांपूर्वी सुधारणा करुन मोबाईल अ‍ॅपची नवीन आवृत्ती (व्हर्जन) सुरू केली. त्याचा मुख्य हेतू प्रवाशांना बसची आरक्षण सेवा अधिक सुलभ पद्धतीने उपलब्ध करणे असा आहे. पारंपरिक तिकीट खरेदी व थेट बस स्थानकावर अवलंबून राहण्याऐवजी प्रवासी आता त्यांच्या स्मार्टफोनवरून तिकीट खरेदी करू शकतात आणि प्रवासाबाबतची माहिती तपासून घेऊ शकतात.

१ एप्रिल २०२५ पासून सुरू केलेल्या नवीन MSRTC BUS RESERVATION ला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळत असून मार्च २०२५ मध्ये ३ लाख ९४ हजार प्रवाशी जुन्या मोबाईल अ‍ॅपचा वापर करत होते. सुधारित अ‍ॅप आल्यानंतर मे २०२५ मध्ये सुमारे ६ लाख ७२ हजार प्रवाशांनी नवीन मोबाईल ॲपचा वापर केला आहे. त्यामुळे सध्या १० लाख युजरचा टप्पा या अ‍ॅपने गाठला असून, लाखो प्रवासी सुधारित मोबाईल अ‍ॅपवरून तिकीटे काढत आहेत.

१ लाख २५ हजार प्रतिक्रिया

अ‍ॅप डाऊनलोड करणाऱ्या प्रवाशांनी आपला अनुभव, अ‍ॅपबद्दलच्या सूचना, तक्रारी या बाबतीत भरभरून प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. अर्थात , वापरकर्त्यांच्या तक्रारी व सूचना यासंदर्भात काही आव्हाने आहेत. नेटवर्क कव्हरेज कमी असलेल्या ग्रामीण भागात रिअल-टाइम माहिती व डिजिटल पेमेंटची सेवा सतत उपलब्ध नसल्याचे तक्रारीत दिसून येतात. तसेच, ज्येष्ठ नागरिक किंवा तांत्रिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या प्रवाशांसाठी ॲपचा वापर अवघड असल्याचेही काहींचे म्हणणे आहे. त्यावर काम करणे सुरू आहे. ग्रामीण भागांतील नेटवर्क समस्या दूर करण्यासाठी एसटी महामंडळाने स्थानिक सुविधांचा विचार करून अ‍ॅपचे UI/UX अधिक सुलभ बनवण्याच्या दिशेने काम सुरू केले आहे.

एसटीच्या मोबाईल अ‍ॅपला प्ले-स्टोअर ॲप मध्ये ४.६ स्टारचे रेटिंग मिळाले आहे. अर्थात, या अ‍ॅपला मिळणारा प्रवाशांचा वाढता प्रतिसाद हा आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा एक महत्त्वाच्या टप्पा आहे. तंत्रज्ञानाचा वापर योग्य नियोजन व स्थानिक अडचणींचा विचार करून केल्यास प्रवाशांना अधिक सुलभ, सुरक्षित व पर्यावरणपूरक सेवा मिळण्याची शक्यता आहे.

Web Title : डिजिटल क्रांति: एसटी बस ऐप पर 10 लाख से अधिक उपयोगकर्ता!

Web Summary : एमएसआरटीसी के नए मोबाइल ऐप को भारी सफलता, 10 लाख उपयोगकर्ता। यात्री ऑनलाइन टिकट बुकिंग को अपना रहे हैं। ग्रामीण नेटवर्क और पहुंच में चुनौतियां हैं। ऐप को 4.6 स्टार रेटिंग मिली।

Web Title : Digital Revolution: ST Bus App Surpasses 1 Million Users!

Web Summary : MSRTC's revamped mobile app sees massive user adoption, reaching 1 million. Passengers embrace easy online ticket booking. Challenges remain in rural network coverage and user accessibility. App receives a 4.6-star rating.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.