शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

पार्थ पवार एकटेच येणार; आजोबांचा राग काका पुतण्याला 'समजावणार'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 1:06 PM

श्रीनिवास पवार हे अजित पवारांचे सख्खे धाकटे बंधू आहेत, ते राजकारणात सक्रीय नाहीत, ते उद्योजक आहेत. पण मागील वेळी अजित पवारांनी बंड केले होते तेव्हाही कौटुंबिक वाद सोडवण्यासाठी श्रीनिवास पवारांनी पुढाकार घेतला होता.

मुंबई :  अजित पवारांचे चिरंजीव आणि लोकसभेचे पराभूत उमेदवार पार्थ पवार यांनी राम मंदिर आणि सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर मत व्यक्त केले होते. यावर जाहिररित्या शरद पवारांनी फटकारल्यानंतर पवार कुटुंबातील कलह पुन्हा समोर आला होता. यावर पार्थ पवार यांची नाराजी घालविण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न सुरु आहेत. 

विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवारांनी बंड केले होते. तेव्हा ते त्यांच्या भावाकडे थांबले होते. आज पार्थ पवार काका श्रीनिवास पवार आणि काकी शर्मिला पवार यांच्याकडे एकटेच जाणार आहेत. अजित पवार कण्हेरीमध्ये येणार नसल्याचे शर्मिला पवार यांनी सांगितले आहे. 

 पार्थ पवार लहान आहे, हळूहळू तयार होतील पण असं जाहिरपणे त्याला बोलणं योग्य नाही अशी नाराजी अजितदादांनी शरद पवारांना बोलून दाखवल्याची माहिती आहे. त्यानंतर आता पार्थ पवार नेमकी पुढील भूमिका काय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहेत. पालकमंत्री या नात्याने अजित पवार यांनी आज पुण्यात झेंडावंदन केले. पार्थ पवारही काल पुण्यात आले होते. पार्थ पवारांची समजूत घालण्यासाठी अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी बोलावले आहे. यासाठी अजित पवार, सुनेत्रा पवार आणि पार्थ असे तिघे तिकडे जाणार होते. मात्र, अजित पवार जाणार नसल्याचे, तसेच पार्थ पवार एकटेच स्नेहभोजनासाठी येणार असल्याचे पवार कुटुंबीयांनी सांगितले आहे. 

शरद पवार काय म्हणाले होते?पार्थ पवार यांनी काही दिवसांपूर्वीच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन सुशांत सिंग राजपूत प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी केली होती. तशा आशयाचं पत्र त्यांनी गृहमंत्र्यांना दिलं होतं. यावर शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्याबाबत कठोर भूमिका घेतली आहे. याविषयी शरद पवार म्हणाले की, "नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत आम्ही देत नाही. त्यांचं वक्तव्य इमॅच्युअर आहे. परंतु सीबीआय चौकशी जर कोणाला करायची असेल, मी स्पष्ट सांगितलं की माझा महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर 100 टक्के विश्वास आहे. पण कोणाला असं वाटत असेल की सीबीआय चौकशीची मागणी करावी, तर त्यालाही कोणी विरोध करायचं कारण नाही.

अजित पवारांचे मौन कायमसिल्व्हर ओकवरील रात्रीच्या घडामोडीनंतर गुरुवारी दिवसभर पार्थ पवारच्या गोटात सामसूम होती. तर अजित पवारांनी देखील या विषयावील आपले मौन सोडले नाही. दिवसभराच्या बैठका आटोपून ते तडक पुण्याला निघून गेले.

कोण आहेत श्रीनिवास पवार?श्रीनिवास पवार हे अजित पवारांचे सख्खे धाकटे बंधू आहेत, ते राजकारणात सक्रीय नाहीत, ते उद्योजक आहेत. पण मागील वेळी अजित पवारांनी बंड केले होते तेव्हाही कौटुंबिक वाद सोडवण्यासाठी श्रीनिवास पवारांनी पुढाकार घेतला होता.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

EPFO मध्ये भ्रष्टाचार; कंपनीकडून 8 लाखांची लाच घेताना सीबीआयची धाड

Video: पुणे! "तुमच्या राज्यात विनापरवानगी आलो"; राज्यपालांची अजित पवारांना कोपरखळी

Independence Day : मुलींचे लग्नाचे वय बदलणार; पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून दिले संकेत

Independence Day : मोठी घोषणा! नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन आजपासून सुरु; पंतप्रधानांनी सांगितला फायदा

आजचे राशीभविष्य - 15 ऑगस्ट 2020; जुने येणे वसूल होईल

IndependenceDay लाल किल्ल्यावरून कोरोना योद्ध्यांना नमन; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण

Independence Day 2020 : "देशात तीन लसी विविध टप्प्यात, प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्याची रूपरेखा तयार"

टॅग्स :parth pawarपार्थ पवारAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसRam Mandirराम मंदिर