शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

१, २, ३ नव्हे तर तब्बल ५ सदस्य बनले लोकप्रतिनिधी; पवार कुटुंबात आता ३ खासदार, २ आमदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 15:53 IST

२०१९ मधील लोकसभा निवडणुकीत पार्थ पवारही निवडणुकीच्या रिंगणात होते. परंतु मावळ लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच पवार कुटुंबातील या सदस्याचा निवडणुकीत पराभव झाला. 

मुंबई - महाराष्ट्रात २ एप्रिलला राज्यसभेच्या ७ जागा रिक्त होत आहे. या जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत ७ पैकी २ जागा पवार कुटुंबालाच मिळणार आहे. महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर शरद पवारांनी पुन्हा एकदा राज्यसभेचा अर्ज भरला आहे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून पार्थ पवार यांनाही राज्यसभेची संधी दिली आहे. 

महाराष्ट्राच्या राजकारणात घराणेशाहीवरून कायम आरोप प्रत्यारोप होत आलेत. त्यात राज्याच्या राजकीय पटलावर पवार कुटुंब कायम चर्चेत राहिले आहे. २०१९ पर्यंत पवार कुटुंबातील शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे या राजकारणात सक्रीय होते. शरद पवार राज्यसभेत, सुप्रिया सुळे लोकसभेत तर अजित पवार आमदार म्हणून बारामतीतून निवडून येत असे. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आणखी एक नाव पवार कुटुंबात प्रामुख्याने चर्चेत आले ते म्हणजे रोहित पवार...रोहित पवारांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदारसंघातून निवडणूक लढवून भाजपाचे दिग्गज नेते राम शिंदे यांचा पराभव केला. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत पार्थ पवारही निवडणुकीच्या रिंगणात होते. परंतु मावळ लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच पवार कुटुंबातील या सदस्याचा निवडणुकीत पराभव झाला. 

२०२३ साली अजित पवारांनी शरद पवारांसोबत फारकत घेत आपली वेगळी राजकीय चूल मांडली. त्यानंतरच्या काळात सुनेत्रा पवार राजकारणात सक्रीय होऊ लागल्या. लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी सुप्रिया सुळेंविरोधात निवडणूक लढवली मात्र त्यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. मात्र काही महिन्यांनी सुनेत्रा पवार यांना पक्षाने राज्यसभेवर खासदारकी दिली. एकीकडे शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार तर दुसरीकडे अजित पवार, सुनेत्रा पवार असं राजकीय समीकरण होते. परंतु दुर्दैवाने २८ जानेवारी २०२६ रोजी अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू झाला. अजित पवारांचे अकाली जाणे पवार कुटुंबासाठी मोठा आघात होता. आता अजित पवारांच्या पक्षाचे पुढे काय होणार असा प्रश्न सगळ्यांना पडला. मात्र काहीच दिवसांत सुनेत्रा पवारांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली. 

सुनेत्रा पवारांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देत राज्यात पहिल्या महिला उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड झाली. बारामती पोटनिवडणूक सुनेत्रा पवार लढवतील अशी चर्चा आहे.  सुनेत्रा पवार यांच्यापाठोपाठ आता पार्थ पवार यांनाही राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. राज्यात राज्यसभेच्या ७ जागांवर बिनविरोध निवडणूक होणार आहे. त्यामुळे आगामी काळात पवार कुटुंबातील तब्बल ५ सदस्य संसदीय लोकशाही प्रणालीत लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना दिसणार आहेत. त्यात खासदार म्हणून शरद पवार, सुप्रिया सुळे, पार्थ पवार तर आमदार म्हणून सुनेत्रा पवार, रोहित पवार यांचा समावेश आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Five Members of Pawar Family Become Representatives: Three MPs, Two MLAs

Web Summary : Pawar family strengthens its political presence. With five members becoming representatives, including three MPs and two MLAs, the family continues to shape Maharashtra's political landscape despite past setbacks and tragedies.
टॅग्स :Sharad Pawarशरद पवारparth pawarपार्थ पवारAjit Pawarअजित पवारSunetra Pawarसुनेत्रा पवारRohit Pawarरोहित पवारSupriya Suleसुप्रिया सुळेRajya Sabhaराज्यसभा