शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
5
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
6
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
7
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
8
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
9
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
10
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
11
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
12
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
13
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
14
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
15
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
16
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
17
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
18
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
19
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
20
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज

पारनेरच्या पाच नगरसेवकांना अजित पवारांनी अखेर मिलिंद नार्वेकरांकडे सोपविले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2020 3:34 PM

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरमध्ये शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी शनिवारी (४ जुलै) राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीने शिवसेनेला धक्का दिला.

मुंबई : पारनेरच्या पाच नगरसेवकांनी महाविकास आघाडीमध्ये मोठा पेचप्रसंग उभा केला होता. काही दिवसांपूर्वी थेट बारामती गाठत अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने शिवसेनेच्या जिव्हारी लागले होते. अखेर दोन दिवसांच्या शरद पवार, अजित पवार यांच्याशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चा करत हा पेच सोडविला आहे. अखेर अजित पवारांनी या पाचही नगरसेवकांना शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याकडे सोपविले आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन करून नगरसेवकांना परत पाठवा, असा निरोप दिला होता. त्यानंतर उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जाणारे मिलिंद नार्वेकर कामाला लागले. त्यांच्या मुत्सद्देगिरीला यश आलं आहे. राष्ट्रवादीत गेलेले पाच नगरसेवक स्वगृही परतले आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरमध्ये शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी शनिवारी (४ जुलै) राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीने शिवसेनेला धक्का दिला. महाविकास आघाडीतील समन्वयावरच यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालं. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन केला. अजित पवारांच्या उपस्थितीत नगरसेवकांचा प्रवेश झाल्यानं ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली. आमचे नगरसेवक परत पाठवा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. मंगळवारी सायंकाळी अजित पवार आणि ठाकरेंची मुंबईत सुमारे दीड तास बैठक झाली.  

यानंतर शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना अजित पवारांनी मंत्रालयात बोलावून घेतले. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत ते पाचही नगरसेवक हजर झाले. आता नार्वेकर आणि लंके हे या नगरसेवकांना मातोश्रीवर घेऊन जाण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे लंके हे देखील आधी शिवसेनेतच होते. मात्र, विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. पारनेर नगरपंचायतीची पुढील दोन महिन्यांत निवडणूक होण्याची शक्यता आहे.

अन्य महत्वाच्या बातम्या...

1962चे युद्ध हरल्यानंतर नेहरू, यशवंतराव देखील सीमेवर गेले होते; शरद पवारांकडून मोदींची स्तुती

मुंबई सावरली! आज दिवसभरात केवळ ७८५ नवे रुग्ण सापडले

एकाच दिवशी भाजपच्या तीन आमदारांना कोरोना; दोन पुण्यातील

मातोश्रीवर जाण्यात कमीपणा कसला? शरद पवारांनी दिले भाजपला उत्तर

CBSE चा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; नववी, बारावीचा अभ्यासक्रम कमी केला

चीनला भिडले, माघार घ्यायला भाग पाडले अन् मगच भारतीय जवान मागे आले!

एक दोन नाही! 11 अमेरिकी लढाऊ विमानांनी चोहोबाजुंनी घेरले; चिनी सैन्य पाहतच राहिले

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारParnerपारनेरNCPराष्ट्रवादी काँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना