शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांची 'ती' मागणी वाढवणार मुख्यमंत्री ठाकरेंच्या अडचणी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2020 10:44 IST

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून एल्गार प्रकरणाच्या समांतर चौकशीचे संकेत

मुंबई: एल्गार परिषद प्रकरणाच्या तपासावरुन महाविकास आघाडीत असलेले मतभेद वारंवार समोर येत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एसआयटीच्या चौकशीची केलेली मागणी, मात्र तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एनआयएकडे तपास सोपवण्यास दिलेली मंजुरी यामुळे महाविकास आघाडीत सारं काही आलबेल नसल्याचं दिसलं. यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एल्गार प्रकरणाच्या समांतर चौकशीचे संकेत दिले आहेत. यामुळे मुख्यमंत्र्यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. एल्गार प्रकरणाचा तपास एनआयकडे सोपवण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी परवानगी दिली आहे. मात्र हा तपास राज्य सरकारनं एसआयटीच्या माध्यमातून करावा, अशी आग्रही मागणी शरद पवारांनी आधीच केली होती. यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवल्यानं शरद पवारांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. केंद्राचा निर्णय अयोग्य असून मुख्यमंत्र्यांनी त्याला दिलेली मंजुरी त्याहूनही अयोग्य असल्याचं पवार म्हणाले होते.यानंतर आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाचा समांतर तपास केला जाऊ शकतो का, याबद्दल कायदेशीर सल्ला घेत असल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. गृह मंत्रालयाकडून या प्रकरणी एसआयटी स्थापन केली जाऊ शकते, याचे संकेत देशमुख यांनी दिले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री आणि ठाकरे आमनेसामने आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आघाडीत बिघाडी? शरद पवार म्हणतात, मुख्यमंत्र्यांच्या 'तो' निर्णय अतिशय अयोग्यअनिल देशमुख यांनी एल्गार प्रकरणाच्या चौकशीचे स्पष्ट संकेत दिले असताना आज सकाळी जळगावात शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत यावर भाष्य केलं. भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषदेची चौकशी ही दोन्ही प्रकरणं वेगळी असल्याचं पवार म्हणाले. सत्य दडपण्यासाठीच केंद्र सरकारनं यात हस्तक्षेप केला आणि राज्याकडून तपास काढून घेतला, असं पवार यांनी म्हटलं. मुख्यमंत्र्यांनी तपास एनआयएकडे सोपवला असताना राष्ट्रवादीकडून एसआयटीमार्फत चौकशीचे संकेत दिले जात असल्यानं महाविकास आघाडीतले मतभेद दिसून येत आहेत. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारAnil Deshmukhअनिल देशमुख