शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

पानसरेंचा मारेकरी मिरजेचा !

By admin | Updated: March 23, 2015 00:52 IST

दाम्पत्याचा गौप्यस्फोट : २५ लाखांची सुपारी घेऊन सराईत पारधी गुन्हेगाराने केली हत्या

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येसाठी मिरज येथील एका सराईत फासेफारधी गुन्हेगाराने २५ लाखांची सुपारी घेतली आहे. पानसरे दाम्पत्यावर हल्ला करून तो कर्नाटकात लपल्याची धक्कादायक माहिती मिरज येथील एका दाम्पत्याने पोलिसांना रविवारी दिली. त्यानुसार या दाम्पत्याकडे पोलीस मुख्यालयात अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल हे दिवसभर माहिती घेत होते, असे विश्वसनीय पोलीस सूत्रांनी सांगितले. पानसरे यांच्या मारेकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलीस शर्थीने प्रयत्न करीत आहेत. पोलिसांची ३५ विशेष पथके विविध स्तरांवर काम करीत आहेत. त्यामध्ये ३५ अधिकारी व ४०० पोलिसांचा समावेश आहे. सर्व स्तरांवर तपास करीत आहेत. गुन्हेगार टोळ्या, रेकॉर्डवरील गुन्हेगारांची कसून चौकशी करीत असताना मिरजेतील एका फासेपारधी दाम्पत्याला पानसरे यांच्या मारेकऱ्यांची माहिती असल्याचे पोलिसांना खबऱ्याकडून समजले. पोलिसांनी तातडीने या दाम्पत्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता ही धक्कादायक माहिती पुढे आली. पानसरे यांच्या हत्येची सुपारी मिरज येथील एका सराईत फासेपारधी गुन्हेगाराने घेतली आहे. त्यासाठी त्याने २५ लाख रुपयांची सुपारी घेतली आहे, असे या दाम्पत्याने पोलिसांना सांगितले. या माहितीने पोलीस चक्रावले. मिरज पोलिसांचे एक पथक त्या दाम्पत्याला घेऊन रविवारी सकाळी कोल्हापुरात आले. पोलीस मुख्यालयामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी त्यांच्याकडून माहिती घेतली. मारेकरी हा कर्नाटकात लपला असून तो आम्हाला २५ हजार रुपये देणार होता, अशी माहितीही त्यांनी पोलिसांना दिली. मारेकरी दाम्पत्याला २५ हजार रुपये कशासाठी देणार होता, याबाबत पोलीस माहिती घेत आहेत. फासेपारधी दाम्पत्याने दिलेली माहिती आणि पोलिसांना आतापर्यंत मिळालेल्या तपासांतील साम्य मिळते-जुळते असल्याने पोलीस युद्धपातळीवर मारेकऱ्यांचा शोध घेऊ लागले आहेत. रात्रीच काही विशेष पथके कर्नाटकात रवाना झाली आहेत. त्या दाम्पत्याला विशेष पोलीस बंदोबस्तात रात्री उशिरा मिरजेला नेण्यात आले, असेही या सूत्रांनी सांगितले.(प्रतिनिधी)पोलीस पथके कर्नाटकात रवानाफासेपारधी दाम्पत्याने दिलेली माहिती आणि आतापर्यंत पोलिसांनी केलेल्या तपासांतील साम्य जुळत असल्याने पोलिसांची काही विशेष पथके रात्रीच कर्नाटकात रवाना झाली असल्याचेही विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.आंबोली येथे संशयास्पद सापडलेल्या मोटारसायकलीचा वापर हा पानसरे यांच्या हत्येतील मारेकऱ्यांनी केला असल्याबाबत अद्याप कोणताच पुरावा मिळत नाही. त्याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे, अशी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने माहिती दिली.