शहरं
Join us  
Trending Stories
1
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
2
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
3
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
5
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
6
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
7
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
8
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
9
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
10
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
12
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
13
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
14
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
15
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
16
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
17
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
18
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
19
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
20
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
Daily Top 2Weekly Top 5

पानसरे हत्येबाबत गुपचिळी!

By admin | Updated: February 25, 2015 02:52 IST

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी अवाक्षरही काढण्यात आले नाही. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांना

मुंबई : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी अवाक्षरही काढण्यात आले नाही. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करणाऱ्या भाजपा- शिवसेना युती सरकारने पानसरे यांच्याबाबत घेतलेल्या अळीमिळीगुपचिळीबाबत सखेद आश्चर्य व्यक्त केले जात आहे.राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असताना एखादी मोठी घटना घडली तर तत्कालीन गृहमंत्री  आर. आर. पाटील हे स्वत:हून घटनेबाबत मंत्रिमंडळाला माहिती देत. नारायण राणे, छगन भुजबळ, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील यांच्यासारखे ज्येष्ठ मंत्री घटनेबाबत तपास कोणत्या दिशेने सुरु आहे, तपासात कोणत्या त्रुटी दिसत आहेत, याचा ऊहापोह करीत. मंगळवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांनी राबवलेल्या स्वच्छता अभियान, तंटामुक्त गाव अभियान व डान्सबार बंदी या निर्णयांचे कौतुक करण्यात आले. मात्र, कॉम्रेड पानसरे यांच्याबाबत ब्र शब्दही उच्चारण्यात आला नाही. गृहखात्याचा कारभार हाकणारे मुख्यमंत्री फडणवीस यांना पानसरे यांच्या हत्येचा तपास कुठवर आला हेसुद्धा मंत्रिमंडळाला सांगावे असे वाटले नाही. तर दुसरीकडे याच मुद्यावरून सरकारवर टीका करणाऱ्या शिवसेनेच्या सुभाष देसाई, दिवाकर रावते यासारख्या मंत्र्यांना पानसरे हत्येबाबत विचारावे वाटले नाही ,याबाबत सखेद आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. (विशेष प्रतिनिधी)